शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्यात दीड कोटीचा ‘मलिदा’

By admin | Updated: August 27, 2015 00:20 IST

आघाडीच्या बैठकीत वादंग : पैसे खाल्लेल्यांची नावे जाहीर करण्यावरून नगरसेवकांत जुंपली; आजच्या सभेकडे लक्ष

कोल्हापूर : नेहरुनगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या ‘बीओटी तत्त्वा’वरील कत्तलखाना मंजुरी प्रकरणावरून बुधवारी महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. या प्रकरणात १ कोटी ४७ लाख रुपये कोणी घेतले, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी करत नगरसेवकांनी बैठकीत चांगलाच गदारोळ केला. हातघाईवर आलेले हे प्रकरण काहीजणांनी मध्यस्थी करत शांत केले. महानगरपालिकेची तहकूब सभा आज, गुरुवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांची बुधवारी सायंकाळी महापालिकेत ही बैठक झाली. महासभेच्या पुरवणी विषयपत्रिकेवरील अठरा क्रमांकाचा विषय या गदारोळास कारणीभूत ठरला. कत्तलखाना उभारणीकरिता भूसंपादनास शासनाच्या रेडिरेकनर दराप्रमाणे होणारा निधी पुनर्वर्गीकरण करून देण्याबाबतचा हा सदस्य ठराव आहे. त्यावर आघाडी बैठकीत चर्चा सुरू होताच नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. हा विषय कशासाठी मंजूर करायचा, असा सवालच काहींनी उपस्थित केला. या प्रकरणात महासभेसाठी ५० लाख आणि वैयक्तिक ९८ लाख रुपये कोणीतरी घेतल्याची चर्चा सुरू आहे. हे पैसे कोणी घेतले त्यांची नावे सांगा, अशी थेट मागणीच बैठकीत अनेकांनी लावून धरली.त्यातच कोणीतरी ‘नेत्यांच्या आदेशाने हा ठराव मंजूर करायचा आहे,’ असे सांगताच नेत्यांची नावे या प्रकरणात घेतली जाऊ नयेत, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे गदारोळात भर पडली. आदिल फरास, राजेश लाटकर आणि सुरेश ढोणुक्षे यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. त्याचवेळी प्रा. जयंत पाटील आणि अजित पोवार यांच्यातही जुंपली. विजय सूर्यवंशी यांनीही यात हात धुऊन घेत पैसे घेणाऱ्यांची आधी नावे सांगा, अशी जोरदार मागणी लावून धरली. महासभेसाठी घेतलेले ५० लाख का वाटले नाहीत, याचा जाबही अनेकांनी ‘कारभाऱ्यां’ना विचारला. ज्यांनी पैसे घेतले त्यांनी घेतले, आता संबंधित ठेकेदाराचे यापुढे नुकसान होऊ नये म्हणून गुरुवारच्या सभेपुढे प्रस्ताव ठेवला असून तो मंजूर करावा, अशी विनंती कारभारी नगरसेवकांनी केली; परंतु अनेकांनी आधी वाटप करा, मगच बघू, अशी आक्रमक भूमिका घेतली. नगरसेवकांना समजावण्याचा बराच प्रयत्न झाला, पण कोणीही तो मान्य केला नाही. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभीकरण, नगरोत्थान रस्ते आणि सीसीटीव्ही प्रकल्पातील मलिद्यावरून नगरसेवकांमध्ये संशयाचे आणि संतापाचे वातावरण आहे. त्यातील मलिदा पोहोचला नसल्याने अनेकजण अस्वस्थ होते. त्यामुळेच कत्तलखान्याच्या विषयावरून वादाला तोंड फुटले. नगरसेवक एकमेकांसमोर ठाकले. शेवटी तणावाच्या वातावरणातच बैठक गुंडाळावी लागली. त्यामुळे गुरुवारच्या सभेत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)