शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

महाडिक तुमच्यासोबत किती दिवस राहणार?

By admin | Updated: December 18, 2015 01:16 IST

विधान परिषद निवडणूक : कोरे यांची फडणवीसांना विचारणा, भाजपमध्ये प्रवेश केल्यास पाठिंबा

कोल्हापूर : आमदार महादेवराव महाडिक यांची प्रत्येक निवडणुकीत वेगळीच भूमिका असते. आताही ते विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आहेत. ते भाजपसोबत किती दिवस राहणार आणि त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा, अशी विचारणा वारणा उद्योग समूहाचे नेते विनय कोरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच केल्याचे समजते. कोरे यांनी बुधवारी (दि. १६) नागपूरला जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांबद्दल आदर असल्यामुळेच त्यांची भेट घेतली; परंतु कोरे गटाने काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांनाच पाठिंबा जाहीर केला असून, थेट प्रचार सुरू केला असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत कोरे यांच्या भूमिकेलाही महत्त्व आहे. त्यांचे मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी अत्यंत चांगले संबंध आहेत. भाजपला आता राज्यात विधान परिषदेतील एकेक जागाही महत्त्वाची आहे; कारण या सभागृहात सत्ताधाऱ्यांचे बहुमत नाही. त्यामुळे कोल्हापुरात कोरे यांनी भाजपने पाठिंबा दिलेल्या महाडिक यांना पाठिंबा द्यावा, असा आग्रह भाजप नेत्यांचा होता. त्यासाठी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोरे यांची वारणानगरला जाऊन भेट घेतली. त्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार ते नागपूरला जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून आले; परंतु त्यांनी मुख्यमंत्र्यांसह अन्य वरिष्ठ नेत्यांना महाडिक यांना पाठिंबा देण्यात आपल्याला अडचणी असल्याचे सांगितले. महाडिक आज अपक्ष म्हणून लढत आहेत. ते भाजपसोबतच राहतील याची खात्री नाही. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा त्यांनी तुमच्या पक्षाचीच उमेदवारी घेतली असती तर मला त्यांना पाठिंबा देण्यात अडचण नव्हती, असेही विनय कोरे यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत सांगितले. (प्रतिनिधी