घर टू घर सर्वेक्षणात २७ जण सापडले पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST2021-05-23T04:24:29+5:302021-05-23T04:24:29+5:30

कोल्हापूर : संजीवनी अभियानांतर्गत महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या घर टू घर सर्वेक्षणात शनिवारी नव्याने २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. ...

House-to-house survey found 27 positive | घर टू घर सर्वेक्षणात २७ जण सापडले पॉझिटिव्ह

घर टू घर सर्वेक्षणात २७ जण सापडले पॉझिटिव्ह

कोल्हापूर : संजीवनी अभियानांतर्गत महापालिका प्रशासनातर्फे करण्यात येत असलेल्या घर टू घर सर्वेक्षणात शनिवारी नव्याने २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यांना तातडीने शहरातील कोरोना काळजी केंद्रात दाखल करण्यात आले.

या सर्वेक्षणामध्ये व्याधीग्रस्त ६०६ नागरिकांपैकी २७ पॉझिटिव्ह व ५७९ निगेटिव्ह आढळले. यावेळी ३ हजार ५३४ व्याधीग्रस्त नागरिकांची वॉक टेस्ट घेण्यात आली. यामध्ये कोरोनासदृश्य लक्षणे असणारे १६३ नागरिक आढळले. ९३८ व्याधीग्रस्त नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली.

मंगळवार पेठ, ब्रम्हेश्वर पार्क, वांगी बोळ, तटाकडील तालीम, राजारामपुरी, आयरेकर गल्ली, जुना बुधवार पेठ, परिट गल्ली, दुधाळी, स्वयंभू गल्ली, पाटील गल्ली, लाईन बझार, कनान नगर, शिवाजी पार्क, ताराबाई पार्क, विक्रम नगर, टेंबलाईवाडी, महाडिक माळ, माळी कॉलनी, निंबाळकर नगर, राजेंद्र नगर, अंबाई टँक, सत्याई नगर, फुलेवाडी रिंगरोड, विचारेमाळ, जाधववाडी, बापट कॅम्प, सदर बाजार, घोडकेवाडी, कारंडे मळा, लक्ष्मीपुरी, कत्यानी कॉम्प्लेक्स येथे हे सर्वेक्षण करण्यात आले.

Web Title: House-to-house survey found 27 positive