शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत हाॅटेल व्यावसायिकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:11 IST

कोल्हापूर : वाशी (ता.करवीर) येथील हाॅटेलमध्ये आॉर्डरप्रमाणे जेवण न दिल्याच्या रागातून अज्ञात चार जणांनी हाॅटेल व्यावसायिकास मारहाण केली. ...

कोल्हापूर : वाशी (ता.करवीर) येथील हाॅटेलमध्ये आॉर्डरप्रमाणे जेवण न दिल्याच्या रागातून अज्ञात चार जणांनी हाॅटेल व्यावसायिकास मारहाण केली. राजाराम रंगराव कांबळे (वय ४४, रा. म्हाडा काॅलनी, नवीन वाशी नाका) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला.

नंदवाळ फाट्याजवळ फिर्यादी कांबळे यांचे हाॅटेल राज आहे. या हाॅटेलमध्ये बुधवारी रात्री चाैघेजण जेवणासाठी आले होते. त्यात ऑर्डर दिल्याप्रमाणे मिळाले नाही. जेवणातील पदार्थ का संपला, अशी विचारणा करत फिर्यादीस मारहाण केली. यात ते जखमी झाले. यावेळी चाैघांनी हाॅटेलमधील प्लास्टिक खुर्च्यांची मोडतोड केली. करवीर पोलिसांनी फिर्यादीनुसार अज्ञात चारजणांविरोधात गुन्हा नोंद केला. तपास सहायक फौजदार पवार करत आहेत.

शेतीच्या कारणावरून सख्या भावास मारहाण

कोल्हापूर : वडिलोपार्जित शेती करायला का देत नाही. या कारणावरून झालेल्या वादातून एकाने सख्या भावास काठीने मारून जखमी केले. अजित रंगराव मडके (वय ५२, रा. उत्तरेश्वर पेठ, उमरावकर गल्ली) असे जखमीचे नाव आहे. दीपक रंगराव मडके (रा. उत्तरेश्वर) या संशयितावर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

फिर्यादी व संशयित हे दोघे सख्ये भाऊ आहेत. त्यांची वडिलोपार्जित शेती सांगरूळ येथे आहे. सर्व शेती आपणास करायला दे. या कारणावरून दोघा भावांमध्ये वादावादी झाली. त्याचे पर्यावसन धाकट्या भावाने फिर्यादी अजित यांच्या डोक्यात चिव्याची काठी मारून लाथाबुक्यांनी मारहाण करत जखमी केले. ठार मारण्याची धमकीही दिली. याबाबत जखमी अजित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित दीपक याच्याविरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला. या प्रकरणाचा तपास ठाणे अंमलदार मिलिंद नलवडे करीत आहेत.

शाहूपुरीतील बँकेतून मोबाईल लंपास

कोल्हापूर : शाहूपुरीतील बँकेतील मोबाईल संच अज्ञात इसमाने लंपास केला. याबाबतची फिर्याद मनोज प्रकाश गायकवाड (वय ३५, रा. सहारा रेसिडेन्सी, फुलेवाडी) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

शाहूपुरीतील साईक्स एक्स्टेंशन येथील बँकेत कार्यालयीन कामकाजाकरीता ठेवण्यात आलेला मोबाईल संच अज्ञात इसमाने लंपास केला. ही घटना शुक्रवारी (दि.१२) दुपारी साडेबारा ते अडीच या दरम्यान घडली. याबाबत बँकेतर्फे फिर्याद गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिसांत दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद झाला. ठाणे अंमलदार घोलप हे तपास करत आहेत.