जगण्याची उमेद - भाग २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:27 AM2021-09-27T04:27:40+5:302021-09-27T04:27:40+5:30

प्रवासी वाहतूक व्यवस्था, हाॅटेल व्यवसाय, करमणुकीशी संबंधित सगळे व्यवसाय आजही अंधारात चाचपडत आहेत. पर्यायी व्यवस्था उभी राहिली. वैयक्तिक वाहनखरेदी ...

Hope of survival - Part 2 | जगण्याची उमेद - भाग २

जगण्याची उमेद - भाग २

googlenewsNext

प्रवासी वाहतूक व्यवस्था, हाॅटेल व्यवसाय, करमणुकीशी संबंधित सगळे व्यवसाय आजही अंधारात चाचपडत आहेत. पर्यायी व्यवस्था उभी राहिली. वैयक्तिक वाहनखरेदी वाढली. पार्सल सुविधा उपलब्ध झाली. ओटीटीद्वारे करमणूक होत आहे. यातून एक गोष्ट लक्षात येते की प्रत्येक गोष्टीला पर्याय आहे. जीवनगाडा सुरूच राहणार मग यात आपण कुठे आहोत हे सिद्ध केले पाहिजे. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत नावीन्याच्या शोध घेतला पाहिजे. पूर्णपणे नोकरी व्यवसाय करणाऱ्या मंडळींना एक गोष्ट लक्षात आली की रोजच्या जीवनात अन्नाला पर्याय नाही. आपल्याकडे थोडीफार जरी शेती असेल तर किमान पोटाला लागणारे धान्य पिकवून जगता येईल. वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी उपलब्ध शेतात जस्तीत जास्त उत्पादन मिळवण्यासाठी औषध आणि खतांचा मारा करून हायब्रिड पीक घेण्यापेक्षा जास्त शेती ओलिताखाली आणून सकस सेंद्रिय शेतीवर भर दिला पाहिजे. शहराकडे येणारा लोंढा कमी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला तरच लोकांना शेती करायला परवडेल आणि बेरोजगार तरुण तुटपुंज्या पगारासाठी घरदार सोडून शहरात उदरनिर्वाहासाठी येण्यापेक्षा शेतात काबाडकष्ट करून शहरवासीयांना पोटभर खायला मिळेल. शेतमालाच्या वितरणात ठराविक व्यापारी मंडळींच्या मनमानी कारभारामुळे शेतकरीवर्ग अडचणीत येताना दिसला. मालाचा उठाव न करता भाव पाडून घेण्यासाठी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातो. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांनी स्वतःची वितरण व्यवस्था सुरू केली तर हाताला काम आणि शेतमालाला योग्य भाव दिला जाऊ शकतो.

व्यवसाय बंद होते. व्यवहार बंद केले. जीवनावश्यक सोडून सगळी कार्य थांबवली. एरवी अविश्रांत धडपडणाऱ्या लोकांनी स्वतःला परिवारासोबत चार भिंतींच्या आत कोंडून घेतले. आज कामावर गेला नाही तर संध्याकाळी चूल पटणार नाही अशा हातावर पोट असणाऱ्या लोकांनीसुद्धा घरात शांत बसून धैर्य दाखवले. अशा अस्थिर वातावरणातसुद्धा लोकांनी मनोनिग्रह दाखवून निराशेच्या गर्तेत न जाता उष:काल होण्याची वाट बघितली. राज्यकर्ते, प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय व्यवस्था, शास्त्रज्ञ सामाजिक सेवाभावी संस्था आपापल्या परीने मार्ग शोधू लागले. सरकारचे आणि जनतेचे उत्पन्न थांबले तरी खर्च वाढले. पण रहाटगाडगे थांबले नाही. टाळ्या वाजवल्या, थाळ्या वाजवल्या, दिवे लावले त्याचवेळी मास्क, पीपीई किट आणि सॅनिटायझर तयार केले, वापरले. शाळा बंद होत्या तरी शिक्षण चालू आहे. मंदिर मशीद गुरुद्वारा चर्च बंद आहेत तरी भक्ती उपासना चालू आहे. देव पावतोय. दैवी कृपा होतच आहेत.

Web Title: Hope of survival - Part 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.