शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय-एसआयटी समन्वयाबाबत बैठक घेवू

By admin | Updated: December 16, 2015 00:20 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : नागपुरात मेघा पानसरे, हमीद दाभोलकर यांच्याशी चर्चा

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत सीबीआय व एसआयटीमधील समन्वयाबाबत बैठक घेतली जाईल. तसेच या तपासासाठी पूर्णत: योगदान देणारे पथक नियुक्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती डॉ. मेघा पानसरे यांनी मंगळवारी ‘लोकमत’ला दिली.ज्येष्ठ कामगार नेते पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत डॉ. पानसरे, हमीद दाभोलकर, अविनाश पाटील आणि संजय शेंडे यांच्या शिष्टमंडळाने नागपुरातील विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यामध्ये २० मिनिटांहून अधिकवेळ चर्चा झाली. याबाबतची माहिती देताना डॉ. पानसरे यांनी सांगितले की, आम्ही मागणी केलेल्या प्रत्येक मुद्द्यावर सहमत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. पानसरे, डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासाबाबत सीबीआय आणि एसआयटीत समन्वय रहावा, यासाठी बैठक घेतली जाईल. तपास प्रक्रियेत पूर्णत: योगदान देणारी टीम कार्यान्वित केली जाईल असे त्यांनी आश्वस्त केले. सनातन संस्थेच्या काही कार्यक्रमांत भाजप-शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिसून आल्याचे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले, त्यावर संबंधित संस्थेच्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही. या संस्थेच्या कार्यक्रमांत सहभागी होवू नये यासाठी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना समज दिली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. (प्रतिनिधी)दाभोलकर, पानसरे हत्या : शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यापानसरे यांच्या खुनाच्या तपासामध्ये कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांची बदली चालू तपास गतीवर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकते. त्यामुळे त्यांची बदली रद्द करावी अथवा त्यांच्या जागी तपासाची माहिती असलेल्या सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी. तपासाबाबत जी स्पेशल तपास टीम तयार केलेली आहे, त्यांना बाकीच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्यामुळे तपासाच्या गतीवर परिणाम होत आहे. तरी या स्पेशल तपास टीममधील प्रमुख आणि इतर अधिकारी यांना इतर कामे न देता केवळ पानसरे खुनाच्या तपासाचे काम द्यावे. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या खुनाचा तपास करणाऱ्या यंत्रणांची नियमित संयुक्त बैठक होऊन त्याचा गृहमंत्री या नात्याने आपण स्वत: आढावा घ्यावा. डॉ. दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासातील दिरंगाईसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट कुटुंबीयांना मिळावी, यासाठी आपण आश्वासन दिल्याप्रमाणे कार्यवाही व्हावी. डॉ. दाभोलकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या घटनांमधील संशयित संघटनांवर कायद्याच्या चौकटीत बसणारी कारवाई करावी. संबंधित संस्थांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवावे. या संस्थांना पाठबळ देणारे पक्ष, संस्था आणि संघटनांना समज देण्यात यावी.