सांगरूळ : येथील शेत परिसरात सकाळी सात गव्यांच्या कळपाचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून शेतामध्ये कामाला जाणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सांगरूळ -मोरेवाडी रोडवरील शेतवडीत सकाळी सात गव्यांचा कळप नागरिकांना दिसला. या सात गव्यांपैकी तीन गवे डोंगराच्या दिशेने गेले, तर चार गवे परिसरातील ऊस क्षेत्रामध्ये घुसले आहेत. सोमवारी दिवसभर वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी थांबून होते. यामध्ये करवीरचे वनपाल विजय पाटील यांच्या मार्गर्शनाखाली वनरक्षक कोमल रहाटे, सुनील हराळे, दोन वनमजूर उपस्थित होते, तर डॉ. संतोष वाळवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीवन संक्रमण आणि उपचार केंद्राचे अमित कुंभार, विकास पाटील हेही घटनास्थळी थांबले होते.
सांगरुळच्या शेतवडीत गव्याचा कळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST
सांगरूळ : येथील शेत परिसरात सकाळी सात गव्यांच्या कळपाचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून ...
सांगरुळच्या शेतवडीत गव्याचा कळप
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}