शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

उद्ध्वस्त ऊस उत्पादकांना मदतीची आस

By admin | Updated: June 3, 2016 01:35 IST

सरकारचे दुर्लक्ष : २५ लाख टनांनी उत्पादन घटणार; शेतकऱ्यांचा आक्रोश; पंचनामे करण्याची मागणी

कोल्हापूर : पाच-सहा महिने पोटच्या पोरासारखा सांभाळ करून वाढविलेला ऊस डोळ्यांदेखत पाण्याविना करपू लागल्याने शेतकरी अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे या करपलेल्या उसाचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात उसाच्या भयावह स्थितीमुळे शेतकरी अक्षरश: उद्ध्वस्त झाला आहे. किमान २५ लाख टन उसाचे उत्पादन घटणार असल्याचा प्राथमिक अंदाज असून, शेतकरी ऊस पेटवून देत आक्रोश करीत असताना सरकारचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्याईमुळे कोल्हापूर जिल्ह्याकडे सधन जिल्हा म्हणून पाहिले जात होते; पण यंदा या सधन जिल्ह्यालाही दुष्काळाचा फटका बसत आहे. पंचगंगा व भोगावती खोऱ्यांत गेले पंधरा-वीस दिवस उपसाबंदी लागू आहे. पिकांना थेंबही पाणी नाही. त्यात उन्हाच्या कडाक्यामुळे ऊस करपून गेला. जिवापाड जोपासलेल्या उसाची अवस्था पाहून त्याकडे बघण्याचे धाडसही शेतकऱ्यांना होईना. वाळलेला ऊस शेतकरी कापून टाकत आहेत, तर काही शेतकरी तो थेट पेटवून देऊन आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. कागल, करवीर, भुदरगड, राधानगरी, पन्हाळा तालुक्यांना याचा मोठा फटका बसला आहे. हजारो हेक्टर क्षेत्रातील ऊस करपल्याने या कार्यक्षेत्रातील साखर कारखान्यांना आगामी हंगामात त्याचा फटका बसणार, हे नक्की आहे. ‘भोगावती’, ‘कुंभी’, ‘शाहू’, ‘मंडलिक’, ‘बिद्री’, ‘घोरपडे’ या कारखान्यांचे गळीत कमी होणार आहे. जिल्ह्यात आगामी हंगामात किमान २५ लाख टन ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. २५ लाख टन ऊस करपल्याने शेतकऱ्यांना सहाशे ते सातशे कोटींचा फटका बसणार आहे. बियाणे, मशागत, पाणी व खतांसाठी हजारो रुपये खर्च झालेले आहेत. यासाठी बॅँकांकडून कर्जे घेतल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. करपलेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)