कोल्हापुरात जोरदार पाऊस, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 11:43 IST2021-11-24T09:28:14+5:302021-11-24T11:43:22+5:30

बुधवारी पहाटे थोडे धुके पडले होते, जसजसा दिवस वर जाईल, तसे आकाशात काळे ढग जमायला लागले. सकाळी साडे सात वाजल्या पासून प्रत्यक्ष पावसाची रिपरिप सुरु झाली.

Heavy rains in Kolhapur, return rains damage farmers crops | कोल्हापुरात जोरदार पाऊस, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

कोल्हापुरात जोरदार पाऊस, अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

ठळक मुद्देबुधवारी पहाटे थोडे धुके पडले होते, जसजसा दिवस वर जाईल, तसे आकाशात काळे ढग जमायला लागले. सकाळी साडे सात वाजल्या पासून प्रत्यक्ष पावसाची रिपरिप सुरु झाली.

कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात बुधवारी सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. गेले दहा दिवस कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या या अवकाळी पावसाने नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम केला आहे, तसेच शेतकऱ्यांचेही नुकसान केले आहे.

बुधवारी पहाटे थोडे धुके पडले होते, जसजसा दिवस वर जाईल, तसे आकाशात काळे ढग जमायला लागले. सकाळी साडे सात वाजल्या पासून प्रत्यक्ष पावसाची रिपरिप सुरु झाली. कळावंडलेलं वातावरण आणि वरून पडणारा पाऊस यामुळे सकाळच्या नागरिकांच्या धावपळीवर परिणाम झाला. साडे आठ नंतर तर पावसाने अधिकच जोर धरला. सुमारे अर्धा तास चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसाने जनजीवन बिघडले असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. साखर कारखाने सुरु झाले असून ऊस तोडणी सुरु झाली असताना पावसाने विघ्न निर्माण केले आहे. पावसाने ऊस तोडणी कमी होत आहे, त्याचा गाळापावर परिणाम होऊ लागला आहे.
 

Web Title: Heavy rains in Kolhapur, return rains damage farmers crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.