शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

अशोकराव माने हॉस्पिटलच्यावतीने आरोग्य शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST

नवे पारगाव : अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल, वाठार यांच्यातर्फे पाडळी, अंबपवाडी, कासारवाडी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर ...

नवे पारगाव : अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटल, वाठार यांच्यातर्फे पाडळी, अंबपवाडी, कासारवाडी या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकूण ८०० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

यावेळी रक्तदाब, मधुमेह, अस्थीरोग, आम्लपित्त, त्वचारोग, दमा, मूळव्याध, भगंदर, मुतखडा आदींसह स्त्रीरोग, लहान मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच कोरोनाची काळजी घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी ही तपासणी केली. पाडळी येथे सरपंच डॉ. विभा पाटील यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत या शिबिराचे उद्घाटन झाले.

यावेळी सरपंच डॉ. विभा पाटील म्हणाल्या, अशोकराव माने यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी व्यापक विधायक कार्य केले. उच्च शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. त्यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा माने कुटुंबीय नेटाने चालवत आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून आरोग्यविषयक कार्य त्यांनी हाती घेतले आहे. आरोग्यविषयक सोयी-सुविधा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. गोरगरीब, गरजू लोकांना या शिबिराचा उपयोग झाला असून, माने हॉस्पिटल लोकांची काळजी घेणारे केंद्र बनले आहे.

यावेळी प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, व्ही. बी. पाटील, धनाजी देसाई, अजित पाटील, श्रीधर पाटील, उदय पाटील, दिनकर पाटील, नितीन पाटील, महंमद पठाण, पद्मा पाटील उपस्थित होते. अंबपवाडी येथे सरपंच पार्वती नाईक, कासारवाडी येथे शोभाताई खोत यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उद्घाटन झाले. डॉ. गिरीश कुमार, डॉ. सत्यजित माने, डॉ. प्रियांका माने यांनी रुग्णांची तपासणी केली.

फोटो ओळी - पाडळी येथे अशोकराव माने आयुर्वेदिक हॉस्पिटलतर्फे आयोजित आरोग्य शिबिराचे उद्घाटन सरपंच डॉ. विभा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनीषा माने, डॉ. गिरीश कुमार, प्रकाश पाटील, धनाजी देसाई, डॉ. सत्यजित माने, डॉ. प्रियांका माने उपस्थित होते.