पेठवडगाव : मिणचे (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती प्रवीण यादव यांच्या युवा शक्तीने एकतर्फी दहा जागा जिंकून विजयाची हॅट्ट्रिक केली. नलिनी घाटगे या २६८ मताधिक्याने विजयी झाल्या. या निवडणुकीत शिखरे विरुद्ध नेताजी वाडकर यांच्यात लक्षवेधी लढत झाली. यात दहा मतांनी शिखरे यांनी बाजी मारली. ग्रामविकास पॅनलचे नेते प्रकाश लोकरे, युवा शक्तीचे नेते अनिल जाधव यांच्या पत्नी सारिका यांचा धक्कादायक पराभव झाला.
............
आज माजी आमदारांची प्रतिष्ठा
मिणचे येथील सभापती प्रवीण यादव हे विकासकामाच्या, जनसंपर्काच्या जोरावर तिसऱ्यांदा सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी ठरले. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या मार्गदशनाखाली सत्तारूढ आघाडी विरोधात सर्वपक्षीय आघाडीस आमदार राजू आवळे यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे आजी- माजी आमदारांच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत यादव यांच्या युवा शक्तीने बाजी मारली.