शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कोविड खरेदीची होऊ शकते चौकशी, हसन मुश्रीफ यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 10:42 IST

CoronaVirus Hasan Mushrif Zp Kolhapur- कोविड काळामध्ये जिल्ह्यामध्ये जी खरेदी झाली. त्यावर लेखा परीक्षणामध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग किंवा शासनाकडून चौकशी होऊ शकते, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेची सरसकट बदनामी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देकोविड खरेदीची होऊ शकते चौकशी, हसन मुश्रीफ यांची माहिती जिल्हा परिषदेची बदनामी नको

कोल्हापूर : कोविड काळामध्ये जिल्ह्यामध्ये जी खरेदी झाली. त्यावर लेखा परीक्षणामध्ये आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग किंवा शासनाकडून चौकशी होऊ शकते, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांचा काहीही संबंध नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेची सरसकट बदनामी करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.मुश्रीफ यांना पत्रकारांनी कोविड खरेदीतील गैरव्यवहाराबाबत विचारणा केली. ते म्हणाले, कोरोना कालात कोल्हापूर जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी धाडसाने काम केले. ५० हजार रुग्णांवर उपचार करण्यात आले.

महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात कुठेही नाही, परंतु आपल्या जिल्ह्यात रेमडेसिवेरची इंजक्शन्स मोफत वितरित करून नागरिकांची सोय करण्यात आली. खासगी दवाखाने बंद होते तेव्हा शासकीय रुग्णालयांनीच चांगली सेवा बजावली. यावेळी शासनानेच अशा पद्धतीने समिती करून खरेदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.या खरेदीबाबत लेखापरीक्षकांनी आक्षेप घेतले आहेत. दरातील तफावतीबाबतही काही तक्रारी आहेत. याची चौकशी होवू शकते. मात्र यामध्ये जिल्हा परिषद पदाधिकारी, सदस्यांची काही भूमिका नव्हती. हा सर्व कारभार अधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची बदनामी केली जाऊ नये, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.जिल्हाधिकाऱ्यांना बोललो होतोया खरेदीबाबतची चर्चा त्याचवेळी माझ्या कानावर आली होती. त्याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही या खरेदीवर लक्ष ठेवा असे बोललो होतो. आता लेखापरीक्षकांच्या अहवालानुसार जी काय चौकशी होणार असेल ती होऊ दे, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफcorona virusकोरोना वायरस बातम्याzpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर