शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचा हर्षवर्धन भोसले वेगवान धावपटू

By admin | Updated: September 1, 2015 21:59 IST

कुमार मैदानी स्पर्धा : सातारचे सचिन, अंकिता, सांगलीचा करण यांचीही चमक

पुणे : महाराष्ट्र राज्य कुमार मैदानी स्पर्धेत सोळा वर्षाखालील गट पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघाने मुलींच्या (६७ गुण) व मुलांच्या (५९ गुण) गटातील सांघिक विजेतेपदासह सर्वसाधारण जेतेपदाच्या चषकावर नाव कोरले. पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघाने यापूर्वी मुंबई येथील वरिष्ठ स्पर्धा, १४ व २० वर्षांखालील गट (पुणे) येथे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील वेगवान धावपटू ठरलेल्या कोल्हापूरच्या हर्षवर्धन भोसलेला सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. शिवछत्रपती पारितोषिक विजेते डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. मुंबईचा मृणाल धुरवाडे बेस्ट जंपर, तर बेस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून पुण्याच्या विकास पुनीयाला सन्मानित करण्यात आले. औरंगाबादचा जीवन बॉचरे सर्वोत्कृष्ट थ्रोअर ठरला. मुलींच्या गटात मानसी पराटकरने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा, तनिष्का शेट्टीने बेस्ट जंपरचा, पूर्णा रावराणेने ब्रेस्ट थ्रोअरचा मान मिळविला. पुणे संघाचे मार्गदर्शक म्हणून विजय बेंगळे, तर व्यवस्थापक म्हणून संपदा कुलकर्णी यांनी काम पाहिले.निकाल : मुले : ८०० मीटर धावणे (२ मि. ०८.४४ से.) : मोना शर्मा (पुणे), प्रवीण प्रकाशारे (सोलापूर), विशाल कुंभारे (जळगाव), २००० मीटर धावणे (६ मि. १०. ५८ से.) : पृथ्वीराज विकास (पुणे), धनाजी हरसुडे (औरंगाबाद), माधवराव निरस (परभणी), हातोडाफेक (३८.५४ मीटर) : अथर्व इंगळे (पुणे), करण बोटे (सांगली), प्रथमेश ओझरकर (पुणे). ५ किलोमीटर चालणे (२४ मि. ४०. ३१ से.) : आनंद शर्मा (पुणे), रितीक सेओलकर (गडचिरोली), सचिन साळुंके (सातारा). मुली : २०० मीटर धावणे (२७.४६ से.) : श्रेया तांगुडे (पुणे), कीर्ती भोईटे (पालघर), आकांक्षा पाटील (कोल्हापूर), १०० मीटर धावणे (१२.८८ से.) : मानसी पराटकर (पुणे), श्रेया तांगुडे (पुणे), तन्वी पाटील (मुंबई), ८०० मीटर धावणे (२ मि.२६.०१ से.) : संगीता शिंदे (पुणे), अंकिता इंगवले (सातारा), प्रगती मुलानी (नाशिक). ३ किलोमीटर चालणे (१७ मि. २४.८५ से.) : पूजा कापसे (अहमदनगर), ऐश्वर्या शिंदे (अहमदनगर), ऋतुजा भामनगोल (कोल्हापूर).