कोल्हापूरचा हर्षवर्धन भोसले वेगवान धावपटू

By Admin | Updated: September 1, 2015 21:59 IST2015-09-01T21:59:55+5:302015-09-01T21:59:55+5:30

कुमार मैदानी स्पर्धा : सातारचे सचिन, अंकिता, सांगलीचा करण यांचीही चमक

Harshwardhan Bhosale of Kolhapur is a fast runner | कोल्हापूरचा हर्षवर्धन भोसले वेगवान धावपटू

कोल्हापूरचा हर्षवर्धन भोसले वेगवान धावपटू

पुणे : महाराष्ट्र राज्य कुमार मैदानी स्पर्धेत सोळा वर्षाखालील गट पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघाने मुलींच्या (६७ गुण) व मुलांच्या (५९ गुण) गटातील सांघिक विजेतेपदासह सर्वसाधारण जेतेपदाच्या चषकावर नाव कोरले. पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघाने यापूर्वी मुंबई येथील वरिष्ठ स्पर्धा, १४ व २० वर्षांखालील गट (पुणे) येथे सर्वसाधारण विजेतेपद मिळविले. स्पर्धेतील वेगवान धावपटू ठरलेल्या कोल्हापूरच्या हर्षवर्धन भोसलेला सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे उपाध्यक्ष प्रल्हाद सावंत यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले. शिवछत्रपती पारितोषिक विजेते डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. मुंबईचा मृणाल धुरवाडे बेस्ट जंपर, तर बेस्ट इमर्जिंग प्लेअर म्हणून पुण्याच्या विकास पुनीयाला सन्मानित करण्यात आले. औरंगाबादचा जीवन बॉचरे सर्वोत्कृष्ट थ्रोअर ठरला. मुलींच्या गटात मानसी पराटकरने सर्वोत्कृष्ट खेळाडूचा, तनिष्का शेट्टीने बेस्ट जंपरचा, पूर्णा रावराणेने ब्रेस्ट थ्रोअरचा मान मिळविला. पुणे संघाचे मार्गदर्शक म्हणून विजय बेंगळे, तर व्यवस्थापक म्हणून संपदा कुलकर्णी यांनी काम पाहिले.
निकाल : मुले : ८०० मीटर धावणे (२ मि. ०८.४४ से.) : मोना शर्मा (पुणे), प्रवीण प्रकाशारे (सोलापूर), विशाल कुंभारे (जळगाव), २००० मीटर धावणे (६ मि. १०. ५८ से.) : पृथ्वीराज विकास (पुणे), धनाजी हरसुडे (औरंगाबाद), माधवराव निरस (परभणी), हातोडाफेक (३८.५४ मीटर) : अथर्व इंगळे (पुणे), करण बोटे (सांगली), प्रथमेश ओझरकर (पुणे). ५ किलोमीटर चालणे (२४ मि. ४०. ३१ से.) : आनंद शर्मा (पुणे), रितीक सेओलकर (गडचिरोली), सचिन साळुंके (सातारा).
मुली : २०० मीटर धावणे (२७.४६ से.) : श्रेया तांगुडे (पुणे), कीर्ती भोईटे (पालघर), आकांक्षा पाटील (कोल्हापूर), १०० मीटर धावणे (१२.८८ से.) : मानसी पराटकर (पुणे), श्रेया तांगुडे (पुणे), तन्वी पाटील (मुंबई), ८०० मीटर धावणे (२ मि.२६.०१ से.) : संगीता शिंदे (पुणे), अंकिता इंगवले (सातारा), प्रगती मुलानी (नाशिक). ३ किलोमीटर चालणे (१७ मि. २४.८५ से.) : पूजा कापसे (अहमदनगर), ऐश्वर्या शिंदे (अहमदनगर), ऋतुजा भामनगोल (कोल्हापूर).

Web Title: Harshwardhan Bhosale of Kolhapur is a fast runner