शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

हातकणंगले, शिरोळ तालुकेच ‘लक्ष्य’

By admin | Updated: November 29, 2015 00:56 IST

विधान परिषदेचे राजकारण : दोन्ही तालुक्यांत १४६ मतदार; इच्छुकांच्या सर्वाधिक गाठीभेटी याच तालुक्यांत

कोल्हापूर : विधान परिषदेच्या उमेदवारीवरून काँग्रेस अंतर्गत जोरदार चढाओढ सुरू असली, तरी इच्छुकांच्या नजरा हातकणंगले व शिरोळ तालुक्यांवरच अधिक आहेत. या दोन्ही तालुक्यांत तब्बल १४६ मतदार आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणालाही मिळो, बंडखोरी कोणीही करू दे, या दोन तालुक्यांतील मतदारच निकाल फिरविणार हे नक्की आहे. त्यामुळेच इच्छुकांच्या सर्वांधिक गाठीभेटी याच तालुक्यांत सुरू आहेत. कोल्हापूर स्थानिक स्वराज मतदारसंघात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिकांचे ३८२ मतदार आहेत. तालुकानिहाय मतदारांची संख्या पाहिली, तर हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक ९३ मतदार आहेत. इचलकरंजी नगरपालिकेत ६२ नगरसेवक, वडगावमध्ये १९, जिल्हा परिषदेचे ११ व हातकणंगले सभापती १ असे ९३ मतदार आहेत. त्यानंतर शिरोळमध्ये जयसिंगपूर पालिकेमध्ये २५, कुरुंदवाडमध्ये १९ व जिल्हा परिषद, पंचायत समिती सभापती ९, असे ५३ मतदार आहेत. या दोन्ही तालुक्यांत १४६ मतदार आहेत. विजयासाठी १९१ ची मॅजिक फिगर गाठावी लागणार आहे. त्यातील १४६ मते या दोन तालुक्यांत आहेत. त्यामुळेच हातकणंगले व शिरोळ तालुक्यांकडे इच्छुकांचे अधिक लक्ष आहे. या बळावरच माजी मंत्री प्रकाश आवाडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर व आमदार महादेवराव महाडिक यांनी शड्डू ठोकला आहे. महाडिक यांनी या दोन तालुक्यांतील मतदारांशी तिसऱ्या वेळेला गाठीभेटी सुरू केल्या आहेत. हातकणंगले, शिरोळपाठोपाठ कोल्हापूर महापालिकेचे ८१ मतदार आहेत. कागल तालुक्यात ४४, तर सर्वांत कमी गगनबावडा तालुक्यात ३ मतदार आहेत. शाहूवाडी, गडहिंग्लज, पन्हाळा तालुक्यांत प्रत्येकी २५ मतदार आहेत. राधानगरी व चंदगडमध्ये प्रत्येकी सहा, तर करवीरमध्ये १२ मतदार आहेत. आजरा तालुक्यात चार मतदार आहेत. (प्रतिनिधी)