शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
4
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
5
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
6
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
7
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
8
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
9
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
10
कोयता सोडून धरली औषधपेटी! ऊसतोड महिला आता फडावरच्या ‘डॉक्टर मॅडम’; बीड पॅटर्नचा राज्याला आदर्श 
11
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
12
हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना
13
"अल्लू अर्जुनची प्रॉपर्टी...", अभिनेत्रीच्या 'त्या' फोटोवर युजरची घाणेरडी कमेंट, दिलं सडेतोड उत्तर
14
PM Modi: पंतप्रधानांच्या आवाहनाचा होतोय परिणाम, 'हे' टेक दिग्गज Work From Home लागू करण्याच्या तयारीत
15
Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे
16
जमिनीच्या व्यवहारासाठी  ले-आउट मंजुरी गरजेची, अन्यथा गुन्हा दाखल होणार; महसूलमंत्री बावनकुळेंचा इशारा
17
ड्रॅगनची अमेरिकेत घुसखोरी! माजी महापौरांनीच दिला देशाला धोका, चिनी एजंट असल्याचं केलं कबूल
18
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
19
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
20
Adhik Maas 2026: अधिक मासात अधिक पुण्यप्राप्तीसाठी 'या' दोन गोष्टी महिनाभर करण्याचा करा संकल्प!
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’ कार्यालयावर शुभेच्छांचा वर्षाव

By admin | Updated: January 10, 2015 00:29 IST

सहावा वर्धापनदिन : कऱ्हाड येथे वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतकांसह मान्यवरांची उपस्थिती

कऱ्हाड : आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छा, अशा उत्साही वातावरणात ‘लोकमत’च्या कऱ्हाड कार्यालयाचा सहावा वर्धापनदिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. वाचक, जाहिरातदार, एजंट, हितचिंंतक, विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावून ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव केला.
‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयाच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त पालिका शाळा क्रमांक ३ मध्ये आयोजित स्नेहमेळाव्यात सर्वप्रथम ‘लोकमत’चे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे, अर्बन कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, पोलीस उपाधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नितीन जगताप, परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे आदींची उपस्थिती होती.
कऱ्हाड जनता बँकेचे अध्यक्ष राजेश पाटील-वाठारकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील, उमा हिंगमिरे, विजय यादव, बाजार समितीचे उपसभापती सुनील पाटील, संचालक प्रकाश पाटील, सचिन निंबाळकर, पंचायत समितीचे उपसभापती विठ्ठलराव जाधव, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, ज्येष्ठ साहित्यिक राजा मंगसुळीकर, नगरसेवक अप्पा माने, प्रमोदसिंह कदम, कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष सुरेश पाटील, विरोधी पक्षनेत्या स्मिता हुलवान, नगरसेवक विनायक पावस्कर, नगरसेवक श्रीकांत मुळे, शारदा जाधव, विनायक विभुते यांच्यासह मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
‘लोकमत’च्या वतीने सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे आदींनी शुभेच्छा स्वीकारल्या. यावेळी जाहिरात विभागाचे राम जोशी, संतोष जाधव, इव्हेंटचे दीपक मनटकर, भक्ती झणझणे व तानाजी पाटील, प्रमोद सुकरे, विश्वजित गुजर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अबुबकर सुतार यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)

मान्यवरांकडून दूरध्वनीवरून शुभेच्छा
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष इंद्रजित मोहिते, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, डॉ. सविता मोहिते, डॉ. अतुल भोसले यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.


ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांच्या हस्ते प्रकाशन : ‘लोकमत’ कऱ्हाड कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी ‘नवी झळाळी कऱ्हाड पाटणची’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला. या विशेषांकाचे प्रकाशन ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेते महादेव मारुती भंडारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महादेव भंडारे यांचे चिरंजिव दिलीप भंडारे, शिवाजी भंडारे, नातू मिलिंद भंडारे, सचिन भंडारे, मयूर भंडारे, पणतू अमेय भंडारे यांच्यासह भंडारे कुटुंबीय उपस्थित होते.