शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

प्रॅक्टिस ‘अ’ वर अर्धा डझन गोल

By admin | Updated: December 19, 2014 00:53 IST

केएसए लीग फुटबॉल: पाटाकडील ‘अ’चे लीग विजेतेपद निश्चित, प्रॅक्टिस ‘ब’विरुद्ध उत्तरेश्वर बरोबरी

कोल्हापूर : ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील आज, गुरुवारी झालेल्या सामन्यात पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ ने प्रॅक्टीस क्लब ‘अ’ वर तब्बल ६-० अशी मात करीत लीगचे विजेतेपद निश्चित केले. तर प्रॅक्टीस ‘अ’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादीक वाघाची तालीम यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहीला. छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेतील दुपारच्या सत्रातील पहिला सामना पाटाकडील ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टीस क्लब ‘अ’ यांच्यात झाला. प्रारंभापासून पाटाकडील ‘अ’च्या ओंकार जाधव , ऋषिकेश मेथे पाटील, रुपेश सुर्वे,प्रशांत नार्वेकर , संजय चिले यांनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रॅक्टीस ‘अ’ वर दबाव निर्माण केला. ९ व्या मिनिटाला पाटाकडील‘अ’ च्या अक्षय मेथे-पाटीलने दिलेल्या पासवर प्रशांत नार्वेकरने हेडद्वारे गोल करीत १-० अशी आघाडी घेतली. प्रॅक्टीस‘अ’ कडून सामन्यात बरोबरी करण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. १८ व्या मिनिटाला प्रॅक्टीस ‘अ’ च्या महेश पाटीलने पाटाकडील‘अ’च्या ऋषिकेश मेथे-पाटीलला मोठ्या डी मध्ये अवैधरित्या अडविले. याबद्दल मुख्य पंचानी पाटाकडील‘अ’ला पेनॅल्टी बहाल करण्यात आली. त्यावर ओमकार जाधवने गोल करीत २-० अशी आघाडी वाढविली. ३० व्या मिनिटाला पाटाकडील‘अ’च्या प्रशांत नार्वेकरने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल केला. प्रॅक्टीसकडून ओंकार पाटील, ऋषिकेश जठार, अविनाश शेट्टी, अभिनव साळोखे, निलेश सावेकर यांनी खोलवर चढाया करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाटाकडील‘अ’च्या बचावफळीपुढे त्यांचे काहीच चालले नाही. उत्तरार्धाच्या प्रारंभी पाटाकडील‘अ’च्या नियाज पटेलने दिलेल्या पासवर ऋषिकेश पाटीलने गोल नोंदवत आघाडी ४-० अशी वाढवली. ५८ व्या मिनिटाला पाटाकडील‘अ’च्या ओंकार जाधवने मैदानी गोल करीत ही आघाडी ५-० अशी आघाडी वाढविली. ७७ व्या मिनिटाला पाटाकडील‘अ’अक्षय मेथे-पाटीलच्या पासवर ऋषिकेश मेथे पाटीलने वैयक्तिक दुसरा व संघाचा ६ वा गोल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसरा सामना प्रॅक्टीस क्लब ‘ब’ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादीक तालीम मंडळ यांच्यात झाला. या सामन्यात दोन्ही संघानी बचावत्मक पवित्रा घेत गोल करण्याचे प्रयत्न केले. उत्तरेश्वरकडून सिद्धार्थ शिंदे, ओंकार लोकरे, स्वराज्य पाटील, मसूद मुल्ला यांनी तर प्रॅक्टीस ‘ब’ कडून प्रथमेश यादव, सौरभ हारुगले, राहूल गाडेकर यांनी गोल करण्याचे अनेक प्रयत्न केले. उत्तरेश्वरचा गोलरक्षक शिवम साळोखे याने,तर प्रॅक्टीस क्लब ‘ब’कडून गोलरक्षक अमोल पसारे यांनी उत्कृष्ट गोलरक्षण करीत उपस्थितांची वाहवा मिळवली. अखेरपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत राहीला. समर्थकांकडून जल्लोषपाटाकडील ‘अ’ने लीग स्पर्धेत सहाव्या फेरीअखेर सहा सामन्यात चार विजय, एक पराभव, एक बरोबरी, ३ गोल घेतले, तर १५ गोल प्रतिस्पर्धी संघावर केले असून सर्वाधिक १३ गुण पटकावले आहेत. बाकीच्या संघाचे सातव्या फेरीअखेर विजय मिळवला तरी १२ गुण होणार आहेत. त्यामुळे सहाजिकच पाटाकडील ‘अ’ने गुणांवर आघाडी घेत लीग विजेतेपदावर आजच शिक्कामोर्तब केल. सामना संपताच समर्थकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. कोल्हापुरातील शाहू स्टेडियम येथे सुरू असलेल्या ‘केएसए’ लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी पाटाकडील ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यातील एक क्षण.