शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात गारांचा वर्षाव

By admin | Updated: May 10, 2015 01:08 IST

वळवाने झोडपले : दिवसभर उष्मा, सायंकाळी पावसाचा थंडावा

 कोल्हापूर : वळीव पावसाने शनिवारी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. सोसाट्याच्या वाऱ्यांसह सुमारे पाऊणतास पाऊस झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दिवसभर जीवघेण्या उष्म्याने हैराण झालेल्यांना सायंकाळी पावसाने थोडासा दिलासा दिला. गेले आठ ते दहा दिवस वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत आहे. सकाळी आठपासूनच अंगाला चटके बसतात. दहानंतर शरीरातून घामाच्या धारा सुरू होतात, तर दुपारी बारानंतर घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावरून जाताना गरम वाफा अंगावर येत असल्याने नागरिकांना विशेषत: वयोवृद्ध नागरिकांना त्याचा कमालीचा त्रास होऊ लागला आहे. गेले आठ दिवस दिवसाची उष्णता कमीत कमी २२ व जास्तीत जास्त ३५ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचली आहे. दिवसभर कमालीचा उष्मा आणि सायंकाळी दमदार पाऊस होत आहे. एक दिवस आड पाऊस सुरू आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता विजेच्या कडकडाटांसह पावसाने अचानक सुरुवात केली. शहराच्या काही भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. अनेक भागांत वाऱ्यामुळे घरांची छते उडून गेली, तर देवकर पाणंद परिसरात रस्त्यातच छप्पर आल्याने वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली. जिल्ह्यातही पाऊस झाला. खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस उपयुक्त आहे. भारनियमनामुळे उसाचे पीक करपू लागले आहे. या पावसाने थोडासा दिलासा मिळाला आहे. काढणीला आलेले सूर्यफुल, भुईमूग आदी पिकांना हा पाऊस थोडासा त्रासदायक ठरत आहे. (प्रतिनिधी)