शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
2
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
3
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
4
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
5
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
6
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
7
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
8
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
9
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
10
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
11
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
12
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
13
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
14
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
15
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
16
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
17
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
18
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
19
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
20
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
Daily Top 2Weekly Top 5

पाडव्याची गुढी... पावसाची उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST

कोल्हापूर : ‘पाडव्याची गुढी आणि पावसाची उडी’ या पारंपरिक म्हणीची प्रचीती मंगळवारी कोल्हापूरकरांनाही आली. गुढी उतरवण्याच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह ...

कोल्हापूर : ‘पाडव्याची गुढी आणि पावसाची उडी’ या पारंपरिक म्हणीची प्रचीती मंगळवारी कोल्हापूरकरांनाही आली. गुढी उतरवण्याच्या वेळेस विजांच्या कडकडाटासह आलेल्या वळवाच्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले. लॉकडाऊनच्या भीतीने आणि पाडव्याच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांचीही पावसाने चांगलीच फजिती केली.

गेल्या चार दिवसांपासून वळिवाच्या पावसाने जिल्ह्यात मुक्कामच ठोकला आहे. दुपारनंतर पाऊस येणार हे ठरलेलेच आहे. मंगळवारीदेखील सकाळपासून प्रचंड उष्मा जाणवत होता. दुपारनंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात सरी कोसळण्यास सुरुवात झाली. शहरात साडेपाच वाजताच पाऊस सुरू झाला. सुरुवातीला हलक्या वाटणाऱ्या सरींनी नंतर मात्र चांगलाच जोर धरला.

उद्यापासून लॉकडाऊन लागेल या भीतीने खरेदीसाठी लोक दुपारपासून घरातून बाहेर पडले होते. पाडवा असल्याने खरेदीचा मुहूर्त साधायचा म्हणूनही लोक सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. कोरोनाचे निर्बंध असतानाही लोकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाकडून निर्बंधाची वारंवार आठवण करून दिली तरी लोक ऐकत नव्हते; पण संध्याकाळी आलेल्या पावसाने एका दमात सर्वांना घरात बसवले. खरेदीच्या उत्साहावरही पाणी पडल्याने विक्रेत्यांचा मात्र हिरमोड झाला.

चौकट ०१

फेरीवाल्यांची दैना

वळवाचा पाऊस पाठ सोडत नसल्याने सुरुवातीचा आनंद आता वैतागात परावर्तित झाला आहे. रोज संध्याकाळी न चुकता पाऊस पडत असल्याने कामे दुपारपर्यंत आटोपून घ्यावी लागत आहेत. फळ विक्रेते फेरीवाल्यांची फजिती होत आहे. एकतर माल वेळेत मिळत नाही, मिळाला तरी निर्बंधामुळे वेळेत विक्री होत नाही. त्यात पावसाची भर पडत असल्याने माल कुजून तोटा वाढला आहे.

चौकट ०२

ज्वारी काळी पडली, उसाला संजीवनी

सलग पाऊस पडत असल्याने काढणीस आलेली ज्वारी, मका, बाजरी आता काळी पडू लागली आहे. काढणीस आलेला मूग, उडीद यालाही मोड येऊ लागले आहे. उन्हाळी भात, नाचणी, भुईमूग यांची फूलगळ वाढली आहे. आडसाली लागणी असलेल्या उसाची उंची जास्त असल्याने तो वारा आणि पावसाच्या माऱ्यावर जमिनीवर लोळू लागला आहे. पूर्वहंगामी, सुरूच्या लागणी व खोडव्यासाठी मात्र हा पाऊस संजीवनी बनून आला आहे. या पावसामुळे या उसाची जोमदार वाढ होणार आहे.

फोटो: १३०४२०२१-कोल- रेन ०१, ०२

फोटो ओळ:

कोल्हापुरात सलग चौथ्या दिवशी मंगळवारी संध्याकाळी वळवाच्या पावसाने हजेरी लावली. गुढीपाडव्याच्या खरेदीचा उत्साह सुरू असताना आलेल्या या पावसाने नागरिकांची फजिती केली. पावसात भिजू नये म्हणून खरेदीसाठी आणलेली पिशवीच डोक्यावर धरून घर गाठावे लागले. (छाया : नसीर अत्तार)