शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:25 IST

Satej Gyanadeo Patil Kolhapur- ऐन कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करणारे कोल्हापूरचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची साथ पूर्णत: आटोक्यात आल्यानंतर मंगळवारी त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वत:च ट्विट करून त्याची माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कुटुंबांशी संबंधित सुत्रांनी सांगितले.

ठळक मुद्देपालकमंत्री सतेज पाटील कोरोना पॉझिटिव्हमुंबईत उपचार : इतरांना संसर्गाचा धोका नाही

कोल्हापूर : ऐन कोरोनाच्या काळात जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्यासाठी रात्रीचा दिवस करणारे कोल्हापूरचे पालकमंत्री व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांना कोरोनाची साथ पूर्णत: आटोक्यात आल्यानंतर मंगळवारी त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी स्वत:च ट्विट करून त्याची माहिती दिली. आपल्या संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. मुंबईत खासगी रुग्णालयात ते उपचार घेत असून त्यांची प्रकृती चांगली असल्याचे कुटुंबांशी संबंधित सुत्रांनी सांगितले.गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनच दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ गृहराज्यमंत्र्यांनाही त्याची लागण झाल्याने खळबळ उडाली. पालकमंत्री पाटील हे प्रजासत्ताक दिन सोहळा केल्यानंतर २६ जानेवारीला दुपारनंतर मुंबईला रवाना झाले होते. त्यांच्या मुलीचा अमेरिकेतील पदवी प्रवेश घेण्यासाठी ते त्याच रात्री मुलीसह अमेरिकेस रवाना झाले.

प्रवेश निश्चिती करून ते ७ फेब्रुवारीस भारतात परतले. त्यानंतर विमानतळावर त्यांची चाचणी झाल्यानंतर त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेली बारा दिवस ते कुणाच्याच संपर्कात नसल्याने अन्य कुणाला त्यांच्यापासून धोका नसल्याचे सांगण्यात आले.कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यावर ते स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात तळ ठोकून बसले होते. त्याशिवाय सीपीआरसह अनेक रुग्णालयांना ते भेटी देत होते. जिल्ह्याची यंत्रणा राबविण्यात त्यांनी पुढाकार घेतला होता. त्याकाळात कोरोनापासून स्वसंरक्षण करण्यात ते यशस्वी झाले होते.

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलministerमंत्रीcorona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर