डीकेटीईकडून शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:29 IST2021-08-17T04:29:18+5:302021-08-17T04:29:18+5:30

इचलकरंजी : जम्मू-काश्मीर येथील राजौरी येथे सेवा बजावताना शहीद झालेले जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना येथील डीकेटीईच्यावतीने कृतज्ञता निधी ...

Gratitude fund from DKTE to the family of Martyr Jawan Sangram Patil | डीकेटीईकडून शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता निधी

डीकेटीईकडून शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना कृतज्ञता निधी

इचलकरंजी : जम्मू-काश्मीर येथील राजौरी येथे सेवा बजावताना शहीद झालेले जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना येथील डीकेटीईच्यावतीने कृतज्ञता निधी देण्यात आला. अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण वीरपत्नी हेमलता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे व आमदार प्रकाश आवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

करवीर तालुक्यातील निगवे खालसा येथील सुपुत्र संग्राम पाटील हे २१ नोव्हेंबरला रात्री २ वाजता शहीद झाले. त्यांच्या कुटुंबांच्या हस्ते डीकेटीईतील ध्वजारोहण करण्यात आले. प्रा. एस. जी. कानिटकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सपना आवाडे, राहुल आवाडे, सुनील पाटील, यु. जे. पाटील, एल. एस. आडमुठे, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

१६०८२०२१-आयसीएच-०२

शहीद जवान संग्राम पाटील यांच्या कुटुंबीयांना डीकेटीईकडून कृतज्ञता निधी अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी दिला. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, सपना आवाडे, राहुल आवाडे, सुनील पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Gratitude fund from DKTE to the family of Martyr Jawan Sangram Patil