शासनाने अर्थसाहाय्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:23 IST2021-04-18T04:23:10+5:302021-04-18T04:23:10+5:30

कोल्हापूर : महापूर आणि कोरोनामुळे कुंभार समाज अडचणीत सापडला आहे. तरी शासनाने अर्थसाहाय्य करून समाजाला या संकटातून सोडवावे, अशी ...

The government should provide financial assistance | शासनाने अर्थसाहाय्य करावे

शासनाने अर्थसाहाय्य करावे

कोल्हापूर : महापूर आणि कोरोनामुळे कुंभार समाज अडचणीत सापडला आहे. तरी शासनाने अर्थसाहाय्य करून समाजाला या संकटातून सोडवावे, अशी मागणी कुंभार समाज सामाजिक संस्थेने केली आहे.

याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुंभार व्यवसाय परंपरागत पद्धतीने चालत आला आहे. दोन वर्षांपूर्वी महापूर व गेल्यावर्षी कोरोनामुळे व्यवसाय बंद पडल्याने संसार चालवणे कठीण झाले आहे. त्यात कर्जाच्या नोटिसा आल्याने अनेक कुंभार कारागीर आर्थिक व मानसिकदृष्ट्या कोलमडले आहेत. तरी शासनाने अर्थसाहाय्य करून समाजाला या संकटातून वाचवावे, अशी मागणी कुंभार समाजाचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, मूर्तीकार संघाचे अध्यक्ष संभाजी माजगावकर, शिवाजी वडणगेकर, सतीश बाचणकर, संभाजी ठाणेकर, प्रकाश तारळेकर, सुनील माजगावकर, अनिल गिवेकर, मनोहर पाडळकर, नितीन माजगावकर, अवधूत निगवेकर यांनी केली आहे.

--

Web Title: The government should provide financial assistance