शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करावा

By admin | Updated: December 19, 2014 23:27 IST

महत्त्वपूर्ण ठराव : कोल्हापुरातील ज्येष्ठ मराठा आमसभा, समाज आचारसंहितेच्या पालन करण्याचे आवाहन

कोल्हापूर : मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने यामधील त्रुटी दूर कराव्यात. पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी, तसेच प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा, असा महत्त्वपूर्ण ठराव आज, शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या ज्येष्ठ मराठा आमसभेत संमत करण्यात आला. मराठा समाजाने आदर्श आचारसंहितेचे पालन करून विवाहातील बडेजाव टाळा, अनाठायी खर्चास फाटा द्या, सामुदायिक विवाहांना प्रोत्साहन द्या, असे प्रबोधनपर आवाहनही यावेळी करण्यात आले.राजर्षी शाहू स्मारक भवनात अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे ज्येष्ठ मराठा आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख उपस्थिती जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांची होती.यावेळी महत्त्वपूर्ण ठराव करण्यात आले. राज्य शासनाची मराठा आरक्षण याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने मूठभर सबळ मराठे वगळता ९० टक्के गरीब मराठ्यांवर दूरगामी परिणाम होणार आहे, तरी शासनाने संपूर्ण मराठा समाजाचा सर्व्हे करावा. मराठा आरक्षणास सर्वपक्षीय संमती असल्याने आरक्षणातील त्रुटी दूर करून पुन्हा टिकाऊ आरक्षणासाठी राज्य शासनाने न्यायालयात दाद मागावी प्रसंगी कायद्यात बदल करून नवीन मराठा आरक्षण कायदा संमत करून घ्यावा. समाजाच्या उन्नती आणि प्रगतीसाठी विज्ञाननिष्ठ आदर्श मराठा आचारसंहितेवर सखोल चर्चा होऊन ज्येष्ठांच्या सूचनेनुसार एकत्रित करण्यात आलेली आचारसंहितेला मान्यता देण्यात आली. प्रबोधनासह कर्मयोगावर अवलंबून राहून ‘प्रगतशील मराठा व उद्योगशील मराठा घडविण्यासाठी प्रयत्न करणे असे महत्त्वपूर्ण ठराव यावेळी संमत करण्यात आले. वसंतराव मुळीक यांनी मराठा आदर्श आचारसंहितेची सविस्तर माहिती दिली. यावेळी या आचारसंहितेचे आचरण केलेल्या दीपा डोणे, शैलजा भोसले, पंडित कंदले, भीमराव कोेतेकर, संभाजीराव जगदाळे, उमेश सूर्यवंशी यांच्यासह प्रभाकर आरडे, डॉ. डी. बी. चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी डॉ. शिवाजीराव हिलगे, शंकरराव शेळके, महादेवराव जाधव, विजय कदम, बाबासाो तिबिले, शैलजा भोसले, अनुराधा घोरपडे, अवधूत पाटील, डॉ. संदीप पाटील, अशोक देशमुख, शाहीर दिलीप सावंत, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मराठा समाज आदर्श आचारसंहिता अशीछत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करावीमराठा संस्कृती टिकविण्यासाठी प्रयत्न करणे, समाज संस्कार करणेविवाह ठरविताना ९६ कुळीचा बाऊ करू नका, कर्तृत्वाला महत्त्व द्या, जन्मकुंडलीचा सांगोपांग विचार करून कालबाह्ण रूढी झुगारून द्या. विज्ञानाची कास धरून रक्तगट तपासणी व्हावी, विवाहपूर्व एचआयव्ही तपासणी व्हावी.समाजाच्या पूर्वजांची व वीरतेची कुलदैवते, कुलस्वामिनी (उदा. जोतिबा, खंडोबा, तुळजाभवानी आदी.)व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनावश्यक रूढी व प्रदर्शन थांबवावे. बारा दिवसांचा दुखवट्याचा कार्यकाळ कमी करून तो ५ ते ७ दिवस करावा. दिवस कार्याला पाहुण्यांना भेटवस्तू देण्याची प्रथा बंद करावी.रक्षाविसर्जन करताना एक कलश रक्षा नदीमध्ये विसर्जन करून उर्वरित रक्षा कुंडात अथवा शेतामध्ये पसरावी.