औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:42+5:302021-02-05T06:51:42+5:30

जयसिंगपूर : औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक शासन असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि ...

The government is positive about the demands of the drug manufacturing authorities | औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

जयसिंगपूर : औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक शासन असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. त्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच नियोजित करण्याचे आदेश आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई मंत्रालय येथे मंगळवारी औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या मागण्यांबाबत मंत्री यड्रावकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी डॉ. अर्चना वालझाडे यांच्यासह औषध निर्माण अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री यड्रावकर यांनी औषध निर्माण अधिकाऱ्यांच्या समस्या समजून घेत त्यावर एकत्रितपणे मार्ग काढण्यासाठी ग्रामविकास विभाग आणि आरोग्य विभागाची समन्वय बैठक लवकरच करण्याचे सांगितले. औषध निर्माण अधिकारी हे पद एकाकी पद असल्याने यात काही धोरणात्मक बदल करण्यासंदर्भात प्रस्ताव विचाराधीन असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी यावेळी स्पष्ट केले. या निर्णयामुळे औषध निर्माण अधिकाऱ्यांचा प्रश्न लवकर मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

फोटो - ०२०२२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The government is positive about the demands of the drug manufacturing authorities