शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘गोकुळ’ चीज, आईस्क्रीम तयार करणार; संचालक मंडळाचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 18:33 IST

‘मुऱ्हा’प्रमाणेच ‘पंढरपुरी’ म्हशीला अनुदान द्या

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघ परराज्यांतील जातीवंत म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते, त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीलाही द्या, अशी मागणी संघाच्या बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत करण्यात आली. संघाचे अध्यक्ष नविद मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.

गोकुळ’ने यापूर्वी आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी पावसाळ्यानंतर केली जाणार आहे. बाजारात चीजला खूप मागणी आहे, ‘गोकुळ’ने हे उत्पादन करावे, असे प्रयत्न सुरू होते. त्याला संचालक मंडळाच्या सभेत मान्यता देण्यात आली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर येथे चीज उत्पादन प्रकल्प आहे. ते उत्पादन घेत नाहीत, त्या ठिकाणी ‘गोकुळ’ने उत्पादन सुरू केले तर त्याचा फायदा होईल. अशी चर्चाही सभेत झाली.

हरियाणा, गुजरात येथील ‘मुऱ्हा’ म्हैस खरेदीवर ‘गोकुळ’ ५० हजार रुपये अनुदान देते. त्याच धर्तीवर पंढरपुरी म्हशीला अनुदान द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

अनुदानाबरोबर म्हैशीच्या किमतीही वाढल्या

‘मुऱ्हा’ म्हैशीच्या अनुदान दहा रुपयांची वाढ करत ५० हजार रुपये केले. पण, अनुदानात जशी वाढ होईल, तशा म्हैशींच्या किमती वाढू लागल्या आहेत. वर्षांपूर्वी साधारणता लाख-सव्वा लाखाला मिळणाऱ्या म्हशींच्या किमती दीड लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे वाढीव अनुदानाचा शेतकऱ्यांऐवजी संबंधित म्हैस मालकालाच अधिक होत असल्याचे काही संचालकांनी निदर्शनास आणून दिले.

केर्लीप्रमाणे गडहिंग्लजला गोठा करणार

एनडीडीबीच्या सहकार्याने जातीवंत म्हैशींचा केर्ली (ता. करवीर) येथे गोठा आहे. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याच धर्तीवर गडहिंग्लज येथे गोठा सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला.

९ सप्टेंबरला ‘गोकुळ’ची सभा

‘गोकुळ’ची सर्वसाधारण सभा दि. ९ सप्टेंबरला होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सोमवार (दि. १८) पासून तालुकानिहाय संपर्क सभेचे आयोजन केले आहे.

संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चीज व आईस्क्रीम तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरेाबर गडहिंग्लज येथे जातीवंत म्हशींचा गोठा एनडीडीबीच्या माध्यमातून सुरू केला जाणार आहे. - नविद मुश्रीफ (अध्यक्ष, गोकुळ)