शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमागासाठी १.८० रुपये दराने वीज द्या

By admin | Updated: June 24, 2015 00:53 IST

उद्योगमंत्र्यांकडे मागणी : इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनची मागणी

इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाची स्वतंत्र वर्गवारी करून १ रुपये ८० पैसे प्रतियुनिट दराने वीज उपलब्ध करून द्यावी. तसेच सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मिळणारे अनुदान यंत्रमागांसाठी पुन्हा चालू करावे, अशा आशयाच्या मागण्या उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे येथील इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने केल्या. याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लवकर निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मंत्री देसाई यांनी दिले.यंत्रमाग उद्योगाकडील विविध समस्या व त्यावरील उपाय याबाबत मंगळवारी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, संचालक चंद्रकांत पाटील, महंमद रफिक खानापुरे, सुनील निवळे, आदींचे एक शिष्टमंडळ मुंबई येथील मंत्रालयात उद्योगमंत्री देसाई यांना भेटले. यावेळी मंत्र्यांना निवेदन देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर झालेल्या चर्चेत कोष्टी यांनी उद्योगासह विविध समस्या मांडल्या. तसेच लघुउद्योगाची मर्यादा पाच कोटी रुपयांपर्यंत वाढल्याने विस्तार करणाऱ्या जुन्या उद्योगांच्या गुंतवणुकीवर बांधकाम क्षेत्र वाढविण्याच्या सवलती मिळाव्यात, यंत्रमाग उद्योगातील कामगारांना जाहीर झालेल्या किमान वेतनाच्या पुनर्रचनेत उत्पादनाशी निगडित वेतन जाहीर करावे, लहान उद्योगांसाठी देण्यात येणारे एक कोटी रुपयांचे विनातारण कर्ज यंत्रमाग उद्योगासाठी सुद्धा देण्याचे आदेश वित्तीय संस्थांना द्यावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)