शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनधारकांना प्रतिमहिना नऊ हजार पेन्शन द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : देशातील खासगी व निमसरकारी क्षेत्रातील ६७ लाख पेन्शनरांना वार्धक्यात आत्मनिर्भर जगता यावे यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : देशातील खासगी व निमसरकारी क्षेत्रातील ६७ लाख पेन्शनरांना वार्धक्यात आत्मनिर्भर जगता यावे यासाठी प्रतिमहिना नऊ हजार रुपये पेन्शनवाढ करावी, अशी मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी लोकसभेत केली.

संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात पेन्शनसारख्या महत्त्वपूर्ण विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत खासदार माने म्हणाले, गेली अनेक वर्षे देशभर ईपीएस - ९५ पेन्शनधारकांचे आंदोलन सुरू आहे. देशात ७६ लाख इतक्या पेन्शनधारकांना प्रतिमहिना एक हजार रुपये ते तीन हजारपर्यंत पेन्शन मिळते. त्यामध्ये त्यांचा उदरनिर्वाह होत नाहीच; पण त्यांच्या औषधांचाही खर्च निघत नाही. त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत व हलाखीचे जीवन हे पेन्शनधारक जगत आहेत. या विषयावर २०१८ ला नेमण्यात आलेल्या श्रम संबंधित संसदीय समितीने दिलेला अहवाल व ईपीएफओच्या संबंधित उच्चस्तरीय समितीने शिफारस केली आहे की, ईपीएस ९५ पेन्शन योजनेअंतर्गत दिल्या जाणार्‍या पेन्शनच्या रकमेमध्ये वाढ केली पाहिजे.

त्याचबरोबर देशातील सर्वोत्तम न्यायव्यवस्था असणार्‍या सर्वोच्च न्यायालयानेही एप्रिल २०१९ मध्ये एका निर्णयात आदेश देताना पेन्शन म्हणून दिली जाणारी रक्कम ही अत्यंत कमी आहे असे सभागृहाच्या निदर्शनास आणून देत, ईपीएस - ९५ योजनेच्या अंतर्गत येणार्‍या पेन्शनधारकांच्या मागणीवर सरकारने कार्यवाही करावी असे सांगितले. केंद्र सरकारने पेन्शन योजनेमध्ये आवश्यक ते बदल करावेत व कोशियारी समितीने केलेल्या शिफारशींचा स्वीकार करून पेन्शनधारकांना व त्यांच्या परिवारास नऊ हजार रुपये प्रतिमहिना बेसिक पेन्शन द्यावी व महागाई भत्ता किंवा मोफत आरोग्य सुविधा द्याव्यात.