शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर पालिकेला ‘क’ वर्ग दर्जा द्या

By admin | Updated: September 10, 2014 23:55 IST

महासभेचा ठराव : खासगी जागेसाठी रंकाळ्याचा सांडवा बदलणार

कोल्हापूर : शहर विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी मिळावा, यासाठी राज्य शासनाने कोल्हापूर महापालिकेला ‘विशेष बाब’ म्हणून ‘ड’ ऐवजी ‘क’ दर्जा द्यावा. महालक्ष्मी देवस्थानाच्या आधारे राज्य शासनाने हा निर्णय घ्यावा, असा ठराव आज, बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सभेत करण्यात आला. टेंबलाईवाडी येथील टिंबर मार्केटच्या आरक्षणात बदल व खासगी जागामालकांच्या फायद्यासाठी रंकाळ्याच्या सांडव्यात बदल करण्याचा निर्णयही सभागृहाने घेतला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या.शहराच्या हद्दवाढीला राज्य शासनाने स्थगिती दिल्याचे समजते, याबाबत प्रशासनास शासनाने काही आदेश पाठविला आहे का? अशी विचारणा निशिकांत मेथे यांनी केली. आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी अशाप्रकारचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर हद्दवाढ झालीच पाहिजे, अशी मागणी संपूर्ण सभागृहाने केली.हद्दवाढीचा प्रश्न रखडल्यानेच शहराच्या लोकसंख्येत वाढ होऊ शकत नाही. लोकसंख्येच्या निकषांवरच महापालिकेचे ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’ असे वर्गीकरण केले जाते. नाशिक व नागपूर शहराची लोकसंख्या कमी असतानाही ‘विशेष बाब’ म्हणून पुढील वर्गवारीत समावेश करण्यात आला. महालक्ष्मी देवस्थानच्या धर्तीवर राज्य शासनानेही कोल्हापूरचा ‘क’ वर्गवारीत समावेश करावा, अशा मागणीचा ठराव महासभेत करण्यात आला. (प्रतिनिधी)खासगी मालकाचा फायदारंकाळ्याशेजारील एका खासगी जमीनमालकाच्या फायद्यासाठी विकास योजनेतील १८ मीटरचा रस्ता रद्द करून रंकाळ्याच्या सांडव्यात फेरबदल करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. मागील तीन सभेत हा विषय नामंजूर करण्यात आला होता. नेत्यांच्या दबावामुळेच सभागृहाने विषयास मंजुरी दिल्याची महापालिकेत चर्चा आहे.आरक्षण बदलास सुरुवातटेंबलाईवाडी येथील सर्व्हे नं. २३ व २४/२ या जागेवर असणारे टिंबर मार्केटचे आरक्षण रद्द करत रहिवासी विभागात या जागेचा समावेश करण्याचा निर्णय महापालिकेत पक्षीय राजकारण सुरू करताना जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी आरक्षणात बदल केला जाणार नाही, अशी भीमगर्जना केली होती. मात्र, सभागृहाने नागरिकांचे हित पुढे करत आरक्षण उठविण्यास सुरुवात केली. येथील रहिवाशांना गुंठेवारी नियमितीकरण सोपे जावे, यासाठीच हा बदल केल्याचा खुलासा उपमहापौर मोहन गोंजारे यांनी केला आहे. असे असले तरी येथून पुढे अशाच रहिवासी व नागरिकांच्या हिताचे कारण पुढे करून अनेक जागांवरील आरक्षण हटविण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.