शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

बंद पडलेल्या साखर कारखान्यांतून इथेनॉल निर्मिती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2019 2:29 PM

देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देबंद पडलेल्या साखर कारखान्यांतून इथेनॉल निर्मिती कराशामराव देसाई यांची पंतप्रधानांकडे मागणी : इथेनॉलच्या दरात वाढ

कोल्हापूर : देशात १५0 हून अधिक साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले असून, त्या कारखान्यांतून थेट उसापासून इथेनॉल निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी जैव इंधन शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शामराव देसाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.इथेनॉलची किंमत प्रतिलिटर २७ रुपये होती, भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यामध्ये वाढ होत गेली. सप्टेंबर २०१८ मध्ये ४८ वरून प्रतिलिटर ५९.१३ रुपये दर झाला; त्यामुळे ऊस व गोड ज्वारीपासून इथेनॉल निर्मिती करणे कारखान्यांना फायदेशीर ठरू शकते. याबाबत अनेकवेळा केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. त्याचे फळ म्हणून इथेनॉलच्या दरात वाढ झाली.

देशात मोठ्या प्रमाणात इंधनाची आयात होते. इंधनाच्या पातळीवर देश परावलंबी आहे; पण शेती मालाच्या माध्यमातून इथेनॉल निर्मिती केली, तर इंधनाची आयात करावी लागणार नाहीच; पण साखरेचे उत्पादन कमी झाल्याने आपोआपच दरात वाढ होऊन हा उद्योगही स्थिरावण्यास मदत होऊ शकते.देशात १५५ पेक्षा अधिक, तर महाराष्ट्रात ४५ साखर कारखाने विविध कारणांनी बंद पडले आहेत. तिथे उसापासून थेट इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे.

यामुळे तेथील शेतकऱ्यांचा फायदा असून, राज्याचा सरासरी उतारा १२ टक्के गृहीत धरला, तर साखर निर्मितीतून प्रतिटन २७५० रुपये एफआरपी मिळू शकते; पण त्याच उसातून इथेनॉल निर्मिती केली, तर प्रतिटन ४१०० रुपये शेतकऱ्यांना दर मिळू शकतो; त्यामुळे केंद्र सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी शामराव देसाई व सुजाता देसाई यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.साखर व इथेनॉल निर्मितीतून मिळणारी एफआरपीउतारा             साखर निर्मिती     इथेनॉल निर्मिती      इथेनॉल निर्मितीने मिळणारा जादा दर१० टक्के              २२०० रुपये             ३३०० रुपये         ११०० रुपये११ टक्के              २४७५ रुपये             ३७०० रुपये         १२२५ रुपये१२ टक्के              २७५० रुपये             ४१०० रुपये          १३५० रुपये१३ टक्के              ३०२५ रुपये            ४५०० रुपये           १४७५ रुपये 

 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने