शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लजला साधेपणाने गणेश विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

रविवार (१९) दुपारी २ पासून शहरातील ‘श्रीं’च्या गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मध्यरात्री तीनच्यासुमारास सर्व मंडळांनी ‘श्रीं’ना निरोप दिला. दरवर्षी ...

रविवार (१९) दुपारी २ पासून शहरातील ‘श्रीं’च्या गणेश विसर्जनाला प्रारंभ झाला. मध्यरात्री तीनच्यासुमारास सर्व मंडळांनी ‘श्रीं’ना निरोप दिला.

दरवर्षी मोठ-मोठ्या ‘श्रीं’च्या मूर्ती आणि विसर्जनावेळी संपूर्ण शहर गर्दीने फुलून जायचे. मात्र, कोरोनामुळे मंडळांनी ‘श्रीं’च्या लहान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच साधेपणाने मिरवणुका काढून पोलीस प्रशासनालाही प्रतिसाद दिला.

मिरवणूक मार्गावर बसवेश्वर पुतळ्याजवळ काही राजकीय व सामाजिक संस्थांकडून, तर नेहरू चौकात पालिकेतर्फे गणेशोत्सव मंडळांना शाल, श्रीफळ देऊन करण्यात येणारा सत्कारही झाला नाही. मिरवणूक जास्त वेळ कशी लांबेल आणि आपल्याच मंडळाच्या मूर्तीचे शेवटी विसर्जन कसे होईल, यामध्ये होणारी चढाओढ यावेळी दिसली नाही.

शहरातील दसरा चौक, अहिल्याबाई होळकर चौक, संकेश्वर रोड, बसवेश्वर पुतळा, बाजारपेठ, नेहरू चौक, शिवाजी चौक ते नदीवेस असा मिरवणूक मार्ग होता. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.

...........

शहरातील सर्वात मोठी मूर्ती आणि मिरवणुकीचे आकर्षण म्हणून नदीवेस राजा मित्रमंडळाच्या मूर्तीचे दर्शन व त्याची मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी करतात. मात्र, यंदा ‘श्रीं’ची मूर्ती लहान असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदा नदीवेस मित्रमंडळाच्या ‘श्रीं’चे आकर्षण गडहिंग्लजकरांना अनुभवता आले नाही.

फोटो ओळी :

गडहिंग्लज शहरातील भीमनगरातील ‘श्रीं’च्या मूर्तीची काढण्यात आलेली मिरवणूक. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २००७२०२१-१६

आकर्षक फ्रेंडस् सर्कलच्या मंडळाने सजविलेल्या कारवरून नेत ‘श्रीं’चे विसर्जन केले. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २००७२०२१-१७

साई तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात न करता पालिकेच्या विसर्जन कुंडात करून ‘पर्यावरण संरक्षण’चा संदेश दिला. (किल्लेदार फोटो)

क्रमांक : २००७२०२१-गड-१८