शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जुगार जोमात अन् पोलीस कोमात

By admin | Updated: December 5, 2014 00:22 IST

क्लबच्या नावाखाली अवैध धंदे : पोलिसांचे व्यावसायिकांशी छुप्या मार्गाने लागेबांधे

एकनाथ पाटील - कोल्हापूर -खून, खुनाचा प्रयत्न, फसवणूक, मारामारी, दरोड्याचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांशी काही पोलिसांचे छुप्या मार्गाने लागेबांधे असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. क्लबच्या नावाखाली जिल्ह्णांत राजरोस जुगार सुरू असून काही क्लबमध्ये पोलिसांची भागीदारी असल्याचे समजते. पोलीस यंत्रणेतील एक वर्ग छुप्या मार्गाने हप्ते गोळा करीत असून ‘क्लब’च्या नावाखाली ‘जुगार जोमात आणि पोलीस कोमात’ अशी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. हाताबाहेर गेलेल्या यंत्रणेला पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी वेळीच लगाम घालण्याची गरज आहे. जिल्ह्यात एकीकडे गुन्हे उघडकीस येत असताना दुसरीकडे मात्र क्राईम रेट दिवसेंदिवस वाढत आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सुरुवातीपासूनच पोलीस यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत, असे कठोर शब्दांत त्यांनी २८ पोलीस ठाण्यांच्या पोलीसप्रमुखांना सूचना दिल्या आहेत. खून, दरोड्याचे गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यामध्ये काही अधिकाऱ्यांचा मोठा वाटा आहे; परंतु दाखवायचे वेगळे आणि खायचे वेळगे दात अशी यंत्रणा काही पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत आहे. ही यंत्रणा छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांना अभय देत असल्याने जिल्ह्यात देशी दारू अड्ड्यांसह मटका-जुगार, क्लब, सेक्स रॅकेट राजरोस सुरू असले, तरी याची कल्पना मात्र पोलीस अधीक्षकांना नाही. डॉ. शर्मा यांनी मुख्यालयात क्राईम बैठक बोलावली की त्यावेळी आमच्या हद्दीमध्ये एकही अवैध धंदा सुरू नसल्याचे अधिकारी छातीठोक सांगतात. मात्र, त्यांच्याच हद्दीत ‘एक बंद तर दोन सुरू’ अशी अवस्था आहे. गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकातील काहीजण रूबाब ठोकण्यातच आघाडीवर आहेत. रेकॉर्डवरील आरोपींशिवाय कोणताही आव्हानात्मक गुन्हा त्यांच्याकडून अद्याप उघडकीस आलेला नाही. हद्दीतील राजकीय गुन्हेगारांच्या अवती-भोवती मिरवणे, चौकातील पानटपरीवर फुकटचे पान खाणे, ठरलेल्या लॉज-हॉटेलमध्ये दोन-दोन तास विश्रांती करण्यात ते माहीर असल्याचे दिसून येत आहे. ‘सफारी कलेक्टर’ शहरातील एका संवेदनशील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांच्या पिढ्या सांभाळत आलेला ‘सफारी कलेक्टर’ गावच्या पाटीलकीप्रमाणे तो या ठाण्याचा वारसा चालवित आहे. इथं येणाऱ्या प्रत्येक पोलीस निरीक्षकाला तोच हवा असतो. त्याच्याशिवाय इथे पानही हालत नाही. त्याच्या बदलीचे धाडस कुणी करीत नाही. मटका, क्लबवाल्यांकडून दरमहा २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत हप्ते गोळा करणाऱ्या या कलेक्टरला पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा चाप लावणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणी पोलीस अथवा अधिकारी गैरकाम करीत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. जिल्ह्यातील किती क्लबना परवानगी दिली आहे, त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली आहे. त्यांच्या यादीमध्ये जे क्लब नाहीत, त्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले जातील. - डॉ. मनोजकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक