शेंद्रीत आज व्हॉलीबॉल स्पर्धा
गडहिंग्लज : शेंद्री (ता. गडहिंग्लज) येथे ओम साईराम स्पोटर्स क्लबतर्फे सोमवारी (दि.२५) सकाळी ९ वाजता खुल्या पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ३००१, २००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.
२) मुगळीच्या दूध संस्थेस उपायुक्तांची भेट
गडहिंग्लज : मुगळी येथील किसान सहकारी दूध संस्थेस महाराष्ट्र दुग्ध विकास उपायुक्त एस. आर. शिपूरकर यांनी सदिच्छा भेट दिली. संस्थाध्यक्ष रमेश आरबोळे यांनी शिपूरकर यांचा सत्कार केला. यावेळी दूध उत्पादकांना शिपूरकर यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी बसवराज धनवडे, संजय जाधव, दुंडाप्पा पाटील आदी उपस्थित होते. श्यामकांत शिंदे यांनी स्वागत केले. शिवाजी माने यांनी आभार मानले.
३) मुगळी येथे मान्यवरांचा सत्कार
गडहिंग्लज : मुगळी येथील म. गांधी सार्वजनिक वाचनालयातर्फे विविध पदांवर निवड झाल्याबद्दल प्रकाश इंगळे, नारायण सुतार, के. डी. धनवडे, दत्ता देशपांडे यांचा वाचनालयाचे सचिव आप्पासाहेब जाधव यांच्या हस्ते सत्कार झाला. यावेळी विजय महाडीक, अवधूत परीट, सुरेश पाटील, आप्पासाहेब कदम, बी. जी. स्वामी, ईश्वर हुल्लोळी, शंकर माने, सागर आरबोळे, गजानन कांबळे आदी उपस्थित होते.