शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज पंचायत समिती राज्यात पहिली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST

गडहिंग्लज : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात ...

गडहिंग्लज :

केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे पंचायत समिती सशक्तीकरण अभियानांतर्गत झालेल्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. अहमदनगर जिल्ह्यातील ‘राहाता’ पंचायत समितीला दुसरा क्रमांक मिळविला.

जानेवारी, २०२१ मध्ये राज्यस्तरावरील कोकण विभागीय समितीने गडहिंग्लज पंचायत समितीच्या कामांची पाहणी केली होती. या यशाबद्दल गडहिंग्लज पंचायत समितीला २५ लाखांचे बक्षीस आणि सन्मानपत्र देऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी, रोजगार हमी योजना, समाजकल्याण, स्वच्छता अभियान, आरोग्य विभागाकडील योजना, राष्ट्रीय पेयजल योजनांसह सर्व विभागातर्फे राबविलेल्या योजना व कामांची पाहणी करून समितीने मूल्यांकन केले होते.

यापूर्वी गडहिंग्लज पंचायत समितीने राज्यस्तरावरील ‘यशवंत पंचायत राज’ स्पर्धेत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्यापाठोपाठ केंद्राच्या पुरस्कारामुळे पंचायत समितीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

याकामी सभापती रूपाली कांबळे, उपसभापती इराप्पा हसुरी यांच्यासह सर्व सदस्य, गटविकास अधिकारी शरद मगर, खातेप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

-------------------------

* ५ वर्षांत दुसऱ्यांदा यश..! यापूर्वी २०१४-१५ मध्येही या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत समितीला राज्य पातळीवर पहिला क्रमांक मिळाला होता. पाच वर्षांनंतर राज्य पातळीवरील या स्पर्धेतील यशाची पुनरावृत्ती झाली आहे.

--------------------

* ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व सदस्यांच्या सक्रिय सहभागामुळे शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी सहजपणे करता आली. त्याचे सादरीकरणही उत्तमरीत्या केले. सर्वांचे सहकार्य व सक्रिय सहभागामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

- शरद मगर, गटविकास अधिकारी, गडहिंग्लज पंचायत समिती.

---------------------------

* गडहिंग्लज पंचायत समिती : ०२०४२०२१-गड-१०