गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:34+5:302021-02-05T06:51:34+5:30

१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीचा एस.टी. पास द्या गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी खासगी शिकवणीसाठी येत आहेत. ...

Gadhinglaj Brief News | गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

गडहिंग्लज संक्षिप्त बातम्या

१) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सवलतीचा एस.टी. पास द्या

गडहिंग्लज : गडहिंग्लज विभागातील अनेक वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी खासगी शिकवणीसाठी येत आहेत. परंतु, सवलतीचा एस.टी. पास नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना एस.टी. पास द्यावेत, अशी मागणी भारतीय मराठा संघातर्फे प्रांताधिकाऱ्यांकडे निवेदनातून करण्यात आली आहे. शिष्टमंडळात सुदर्शन चव्हाण, रमेश तिकोडे, प्रताप मोहिते, सानिया मकानदार, साक्षी जाधव, अपर्णा लोहार, वैष्णवी येसरे, सानिका रेडेकर, आकांक्षा रानगे, अक्षता भोसले, शीतल होडगे यांचा समावेश होता.

--------------------------

२) पोलिओ अभियानात घाळी महाविद्यालयाचा सहभाग गडहिंग्लज : पोलिओ लसीकरणाच्या राष्ट्रीय अभियानात येथील घाळी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्रसेनेच्या ३४ सैनिकांनी आपल्या गावातील बुथवर स्वयंसेवक म्हणून काम केले. प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, कमांडिंग ऑफिसर कर्नल आर. बी. होल्ला, प्रा. अश्विन गोडघाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

--------------------------

३) गडहिंग्लजमध्ये ‘संगायो’चे १०१ अर्ज मंजूर

गडहिंग्लज : संजय गांधी निराधार योजनेंतर्गत प्राप्त १०१ अर्ज समितीच्या बैठकीत मंजूर झाले. तहसीलदार दिनेश पारगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. एकूण प्राप्त १३८ पैकी संजय गांधी निराधार योजनेचे ७६, तर श्रावणबाळ निराधार अनुदानाचे २५ अर्ज मंजूर करण्यात आले. ३२ अर्ज फेरचौकशीसाठी पाठविण्यात आले, तर ५ अर्ज अपात्र ठरले.

बैठकीस समितीचे अध्यक्ष अमर चव्हाण यांच्यासह सर्व सदस्य, नायब तहसीलदार नंदकुमार सोनवणे, अव्वल कारकुन विकास कोलते व जावेद बागवान, श्रीकांत शिंदे उपस्थित होते.

--------------------------

४) गडहिंग्लजला शिवसेनेतर्फे कर्नाटक शासनाचा निषेध गडहिंग्लज : कर्नाटक उपमुख्यमंत्र्यांच्या बेताल वक्तव्याचा आणि महाराष्ट्राच्या बसेसवर लावण्यात आलेल्या ‘गडहिंग्लज कर्नाटका’चे या फलकाबद्दल येथील शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदविला.

यावेळी उपशहरप्रमुख काशिनाथ गडकरी, हालाप्पा भमानगोळ, महादेव नाईक, प्रकाश पाटील, राज जाधव, दीपक डवर, अशोक खोत, राजू मांगुरे, निकेतन सुतार, दिगंबर पाटील उपस्थित होते.

Web Title: Gadhinglaj Brief News