अत्याळच्या जवानावर शोकाकुलात अंत्यसंस्कार

By Admin | Updated: July 7, 2015 01:41 IST2015-07-07T01:41:08+5:302015-07-07T01:41:08+5:30

अपघातात झाले होते गंभीर जखमी

Funeral procession in Shokakul on the lavender jaw | अत्याळच्या जवानावर शोकाकुलात अंत्यसंस्कार

अत्याळच्या जवानावर शोकाकुलात अंत्यसंस्कार

गडहिंग्लज : अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील जवान सुरेंद्र शिवाजी देवरकर यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. निपाणीनजीक झालेल्या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान रविवारी (दि. ५) सकाळी पुणे येथे त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी आठच्या सुमारास पुण्याहून त्यांचे पार्थिव जन्मगावी अत्याळ येथे घरी आणण्यात आले. यावेळी वडील शिवाजी, आई सिंधुताई, पत्नी रेश्मा, बहीण सविता व सुप्रिया यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
तहसीलदार हनुमंत पाटील, सुभेदार पी. के. सिंग, जिल्हा सैनिक कल्याण विभागाचे निवृत्त सुभेदार तानाजी संकपाळ, आजी-माजी सैनिक संघटनेचे धोंडिबा हळदकर यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना आदरांजली वाहिली.
नंदापाचीवाडीनजीकच्या शेतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्राचार्य एस. आर. पाटील, विजय पाटील, आर. के. मोहिते यांची श्रद्धांजलीपर भाषणे झाली. बॉम्बे रेजिमेंट व व्हाईट आर्मीच्या जवानांसह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Funeral procession in Shokakul on the lavender jaw