शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
3
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
4
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
5
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
6
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
7
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
8
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
9
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
10
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
11
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
12
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
13
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
14
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
15
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
16
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
17
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
18
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
19
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
20
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 12:37 IST

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. 

ठळक मुद्देग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका

गडहिंग्लज : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या विकास निधीतून गडहिंग्लज नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून दिली. या शववाहिकेची चावी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते उदय जोशी यांच्याहस्ते नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी व मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नगराध्यक्षा कोरी म्हणाल्या, गडहिंग्लज उपविभागात कोरोना रूग्ण व मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोविड मृतांवर गडहिंग्लजमध्येच अंत्यसंस्कार केले जात आहेत. त्यासाठी शववाहिकेची गरज होती. मंत्री मुश्रीफ यांनी पालिकेच्या मागणीची दखल घेवून तातडीने शववाहिका दिली. शहरवासीयांच्यातर्फे मी त्यांचे आभार मानते.माजी उपनगराध्यक्ष किरण कदम म्हणाले, यापूर्वी मुश्रीफ यांनी आपल्या फौंडेशनतर्फे गडहिंग्लज पालिकेला रूग्णवाहिका दिली होती. त्यानंतर आता शववाहिका देखील दिली. त्यामुळे गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातील जनतेची गैरसोय दूर झाली.यावेळी उपनगराध्यक्षा शकुंतला हातरोटे, नगरसेवक हारूण सय्यद, रेश्मा कांबळे व सुनिता पाटील, माजी नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे, राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष गुंड्या पाटील, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा शर्मिली पोतदार, सुरेश कोळकी, शारदा आजरी, तुषार यमगेकर, उदय परीट, संतोष कांबळे, अमर मांगले, चंद्रकांत मेवेकरी, राजू जमादार आदी उपस्थित होते. मुश्रीफांची तत्परता..!शववाहिका नसल्यामुळे एका कोविड रूग्णाचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी डंपरमधून नेण्याची वेळ आली होती. त्यामुळे ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांनी नगरपालिकेला शववाहिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगराध्यक्षा प्रा. कोरी यांनी महिन्यापूर्वी गडहिंग्लज येथील आढावा बैठकीत केली होती. त्याच बैठकीत त्यांनी आपल्या फंडातून शववाहिका देण्याची घोषणा केली होती. महिन्याच्या आत त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर