जयसिंगपूर बाह्यवळण रस्त्यासाठी चार कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST2021-04-23T04:25:48+5:302021-04-23T04:25:48+5:30

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराबाहेरून चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीपासून नांदणी नाका मार्गे केपीटीजवळून जाणारा रस्ता रुंदीकरणासह मजबूत करण्यासाठी चार कोटींचा निधी ...

Funding of Rs. 4 crore for Jaysingpur Bypass Road | जयसिंगपूर बाह्यवळण रस्त्यासाठी चार कोटींचा निधी

जयसिंगपूर बाह्यवळण रस्त्यासाठी चार कोटींचा निधी

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराबाहेरून चौंडेश्वरी सहकारी सूतगिरणीपासून नांदणी नाका मार्गे केपीटीजवळून जाणारा रस्ता रुंदीकरणासह मजबूत करण्यासाठी चार कोटींचा निधी सीआरआयएफमधून मंजूर झाला आहे, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. या मार्गावरील वाढत्या रहदारीचा विचार करता तसेच बरीच वर्षे या रस्त्याची डागडुजीसुद्धा झाली नसल्यामुळे हा रस्ता खराब झाला होता. हा रस्ता मजबूत व्हावा, अशी मागणी या वाहनधारकांतून होत होती. त्यामुळे या रस्त्यासाठी चार कोटींचा निधी उपलब्ध झाला असल्याची माहिती मंत्री यड्रावकर यांनी दिली. सध्या सात मीटर रुंदीने असलेला हा रस्ता नव्याने दहा मीटर रुंद होणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुलभ होऊन मार्गावरील अनेक अडथळे दूर होणार आहेत. सिद्धिविनायक मंदिर ते चौंडेश्वरीपर्यंतचा रस्ता दहा मीटर रुंदीने बीव्हीएम कारपेट प्रणालीनुसार होणार असल्याचेही मंत्री यड्रावकर यांनी सांगितले.

Web Title: Funding of Rs. 4 crore for Jaysingpur Bypass Road