शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडून देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:23 IST

कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.

ठळक मुद्देरस्त्यांच्या कामासाठी निधी कमी पडून देणार नाहीचंद्रकांत जाधव यांची ग्वाही : रस्ते दर्जेदार करण्याची सूचना

कोल्हापूर : शहरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी शुक्रवारी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांना केली. रस्त्यांच्या कामासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली.शहरातील खराब झालेल्या रस्त्यांबाबत आमदार जाधव यांनी आयुक्त डॉ. कलशेट्टी आणि अधिकाऱ्यांसह व्यापक आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्तांनी सध्या सुरू असलेल्या पॅचवर्कच्या कामाची माहिती दिली. तसेच मुख्य रस्त्यांचे पॅचवर्क करण्यासाठी एक कोटी ६२ लाखांच्या कामाची निविदा १९ तारखेपर्यंत अंतिम होऊन लवकरच ही कामे सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. या वर्षीची मंजूर निधीतील कामेही सुरू करण्याबाबत ठेकेदारांना सूचना दिल्याचे आयुक्तांनी सांगितले .शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेचा टप्पा २ साठी राज्य शासनाकडे १७८ कोटींचा प्रस्ताव सादर केलेला आहे. कळंबा येथील साईमंदिर ते नवीन वाशीनाका या रिंग रोडच्या डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे, असे सांगितले.सुमारे १५ वर्षांहून अधिक काळ डांबरही न पाहिलेल्या आणि सर्वाधिक अवजड वाहनांची वाहतूक असणाऱ्या शिवाजी उद्यमनगर आणि लक्ष्मीपुरी परिसरातील रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.

यासह वाय. पी. पोवारनगर या तीनही वसाहतीमधील मुख्य आणि अंतर्गत रस्ते नव्याने करण्यासाठी १७८ कोटींचा प्रस्ताव आपण तो मंजूर करून आणू, अशी ग्वाही देत आमदार जाधव यांनी यासाठी प्रशासनाने कोणत्याही त्रुटी न राहणारा प्रस्ताव अंतिमरीत्या सादर करावा, अशी आग्रही सूचना ही दिली.रस्त्यांची कामे दर्जेदार होण्यासाठी ती संबंधित कनिष्ठ अभियंता, उपशहर अभियंता यांच्या देखरेखीखाली करा, असेही आ . जाधव यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, नगरसेवक संभाजी जाधव, कनिष्ठ अभियंता, आदी उपस्थित होते .

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाcommissionerआयुक्त