शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी संचालकांची सुनावणी पूर्ण

By admin | Updated: October 15, 2015 00:44 IST

चौकशी अधिकाऱ्यांची कारवाईच बेकायदेशीर : सहकारमंत्र्यांच्या निकालाकडे सहकारक्षेत्राचे लक्ष

 कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे ४५ माजी संचालक व एका कार्यकारी संचालकांची सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर बुधवारी सुनावणी पूर्ण झाली. पाच वकिलांनी लेखी व युक्तिवादाद्वारे संचालकांचे म्हणणे मांडून चौकशी अधिकारी सचिन रावळ यांनी केलेली कारवाईच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद माजी संचालकांच्या पाच वकिलांनी सहकारमंत्र्यांसमोर केला. माजी संचालकांवर कलम ८८ नुसार १४७ कोटींची जबाबदारी निश्चितीची कारवाई चौकशी अधिकाऱ्यांनी केली आहे. बॅँकेचे १४७ कोटींच्या झालेल्या नुकसान भरपाईच्या नोटिसा माजी संचालकांना लागू केलेल्या आहेत. याविरोधात माजी संचालकांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सहकारमंत्र्यांसमोर सुनावणी घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार सुनावणीची प्रक्रिया सुरू होती. बुधवारी मंत्रालयात सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासमोर तब्बल पाच तास सुनावणीची प्रक्रिया झाली. ज्या २८ संस्थांच्या थकबाकीपोटी चौकशी अधिकाऱ्यांनी माजी संचालकांना जबाबदार धरत १४७ कोटी रुपयांच्या वसुलीच्या नोटिसा लागू केल्या आहेत, त्या बेकायदेशीर आहेत. या थकीत संस्थांवर जिल्हा बॅँकेने दावे दाखल केलेले आहेत. कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर संबंधित संस्थांकडून वसुली होत नाही, असे सिद्ध झाल्यानंतर बॅँकेच्या संचालकांवर जबाबदारी निश्चितीची कारवाई होऊ शकते, असे अ‍ॅड. लुईस शहा यांनी सांगितले. संबंधित संस्थांना कर्जवाटप करताना आपले पक्षकार बॅँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीलाच हजर नव्हते; त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी निश्चित होऊच शकत नसल्याचे अ‍ॅड. दत्ता राणे यांनी सांगितले. दुपारी चारपर्यंत मंत्री पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली. सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता सहकारमंत्री पाटील काय निकाल देतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जिल्हा बँक : सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनेच लाभांश माजी संचालकांवरील कारवाईमध्ये लाभांश हा महत्त्वाचा मुद्दा आहे. २००७-०८ मध्ये जिल्हा बॅँक तोट्यात असताना संस्था सभासदांना लाभांशाचे कसे वाटप केले, असे ताशेरे लेखापरीक्षण अहवालात मारले आहेत. लाभांश वाटपातून बॅँकेचे झालेले नुकसान संचालकाकडून वसूल करण्याचे आदेश दिलेले आहेत. याबाबत युक्तिवाद करताना अ‍ॅड. शहा म्हणाले, सर्वसाधारण सभेत ठराव करून सभासदांना लाभांश दिल्याने त्याची जबाबदारी संचालकांवर येत नाही.