शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थ्यांचा प्रांत कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

शिरोळमधील आंदोलनकर्ते : संजय गांधी, श्रावणबाळ प्रकरणे निकाली काढण्याची मागणी

इचलकरंजी : संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजनांची प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकालात काढावी, यासह विविध मागण्यांसाठी शिरोळ तालुका शेतमजूर श्रमिक संघटनेच्यावतीने गुरुवारी येथील प्रांत कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. याची दखल घेत याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांनी शिरोळचे तहसीलदार सचिन गिरी यांना बोलावून घेऊन चर्चा केली. यावेळी मार्ग न निघाल्याने आंदोलन सुरूच राहिले. अपंग, वृद्ध लाभार्थी प्रांत कार्यालय चौकातच ठाण मांडून बसले आहेत. दरम्यान, आज, शुक्रवारी भीक मागो आंदोलन करण्यात येणार असून, टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविणार असल्याचे संघटनेचे कार्याध्यक्ष सुरेश सासणे यांनी सांगितले.शिरोळ तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करावीत, यासाठी ५ मे रोजी शिरोळ तहसील कार्यालयात आंदोलन करण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात आजतागायत काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संघटनेच्यावतीने गुरुवारी सकाळी अकरा वाजता येथील महात्मा गांधी पुतळ्यापासून वृद्ध महिला-पुरुष व अपंगांसह मुख्य मार्गावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा प्रांत कार्यालयावर आल्यानंतर तेथे प्रांतांना माहिती देण्यात आली. याबाबत चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी जिरंगे यांनी तहसीलदार गिरी यांना बोलावून घेतले. संघटनेचे सासणे यांना बोलावून घेऊन चर्चा केली. मात्र, चर्चेतून मार्ग निघाला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत प्रांत कार्यालयाच्या परिसरातून न हलण्याचा निर्णय घेत ठिय्या मारला. आजपासून भीक मागो आंदोलन, दंडवत मोर्चा, तिरडी मोर्चा काढून श्राद्ध घालण्याचा इशारा सासणे यांनी दिला आहे. तसेच राजापूरचे तलाठी सनदी व कोतवाल यांच्या आडमुठ्या धोरणामुळे लाभार्थ्यांची फरफट होत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणीही सासणे यांनी केली आहे. (वार्ताहर)कागदपत्रांची तपासणी करून निर्णययाबाबत प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित लाभार्थ्यांचा विषय हा तहसील कार्यालयाच्या अधिकारात येत असून, लाभार्थ्यांनी आपल्या कागदपत्रांसह तहसील कार्यालयात दाद मागितल्यास कागदपत्रांची तपासणी करून निर्णय घेतला जाईल, असे आंदोलकांना सांगितले आहे. मात्र, तुमच्या यंत्रणेमार्फतच चौकशी करून लाभार्थ्यांचा समावेश करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतल्यामुळे तोडगा निघाला नसल्याचे सांगितले.