फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:29+5:302021-02-05T06:52:29+5:30

बजाज इंडिया फायनान्स कंपनीचे सहा लाखांचे लोन देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक झाली आहे. याबाबत संशयित सातजणांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद ...

Fraud under the pretext of giving a loan to a finance company | फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

फायनान्स कंपनीचे लोन देण्याच्या बहाण्याने फसवणूक

बजाज इंडिया फायनान्स कंपनीचे सहा लाखांचे लोन देण्याच्या बहाण्याने एकाची फसवणूक झाली आहे. याबाबत संशयित सातजणांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद चंदगड पोलिसांत दिली आहे. अमोल रमेश राजवैध (कनिष्ठ लिपिक, दिवाणी न्यायालय, चंदगड, मूळ गाव रा. शेगाव, ता. शेगाव, जि. बुलडाणा, सध्या रा. विनायगर नगर चंदगड) यांनी ही तक्रार पोलिसांत दिली आहे. १६ सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या दरम्यान मुदतीत ही घटना घडली आहे. यासंदर्भात पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – फिर्यादी अमोल राजवैध हे चंदगड येथील दिवाणी न्यायालयात कनिष्ठ लिपिक म्हणून कामाला आहेत. अमोल यांना ६ लाख २९ हजार ८०० रुपयांचे कर्ज ३ टक्के दराने मंजूर करुन देतो, असे आमिष दाखवले. यासाठी वेळोवेळी मोबाईलवर संदेश पाठवून व संभाषण करून व्हॉट्अप कॉल करून आमिष दाखवले. तसेच त्यांच्याकडून बँक आफ इंडिया चंदगड शाखेतील बचत खात्यातून भरून घेऊन फिर्यादीला कर्ज मंजूर न करता संशयित प्रियांका व खुशी नावाची महिला, नीरज गुप्ता, अभिषेक, कोमल शर्मा, पंकज टेंडा, रुद्रप्रताप (सर्व पत्ता : बजाज इंडिया फायनान्स, १५३०८, कार्पोरेट ऑफिस, बी-११, पहिला मजला, सेक्टर १६, वर्धमान प्लाझा, ब्यू डॉर्ट ऑफिसचे वरती, मेट्रो स्टेशनचे विरुध नोएडा उत्तर प्रदेश पिन क्र. २०१३०१) यांनी फिर्यादी यांचा विश्वासघात करून फसवणृूक केली आहे. त्यामुळे बजाज इंडिया फायनान्स कंपनीतील वरील ७ जणांच्या विरोधात चंदगड पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पो. हे. कॉ. श्री. नांगरे तपास करत आहेत.

Web Title: Fraud under the pretext of giving a loan to a finance company