शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून फसवणूक

By admin | Updated: November 21, 2014 00:54 IST

ग्राहक पंचायत : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : मोबाईल ग्राहक सेवा केंद्रांकडून ग्राहकांना चांगली वागणूक तर दिली जात नाहीच, शिवाय त्यांची फसवणूकही होत आहे. त्यामुळे कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून त्यांची ग्राहक पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आज, गुरुवारी ग्राहक पंचायतीतर्फे जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.जिल्ह्यातील मोबाईल विक्रेते विक्रीपश्चात सेवेसाठी ग्राहकांना ग्राहक सेवा केंद्राकडे जाण्यास सांगतात. विविध मोबाईल उत्पादकांची कोल्हापुरात सेवा केंद्रे आहेत; परंतु ती ग्राहकांना योग्य वागणूक देत नाहीत. उडवाउडवीची उत्तरे देऊन सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य असतानाही त्यांच्याकडून ती दिली जात नाही. यामुळे मोबाईलधारक ग्राहकांची फसवणूक होत आहे. याला प्रतिबंध होणे आवश्यक आहे. यासाठी कोल्हापुरातील सर्व मोबाईल कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्रप्रमुखांना बोलावून घेऊन ग्राहक पंचायतींच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी. ही केंद्रे मोबाईल सेटमध्ये असणाऱ्या दोषांचे निराकरण करीत नाहीत. मोबाईल सेट ठेवून घेऊन तो वर कंपनीकडे पाठवितो म्हणून सांगितले जाते; परंतु कोणत्याही प्रकारची दुरुस्ती न करता नादुरुस्त असलेला मोबाईल जसाच्या तसा परत दिला जातो. यामुळे ग्राहकाला विशेषत: ग्रामीण भागातील ग्राहकाला याचा विनाकारण भुर्दंड सहन करावा लागतो.अशा प्रकारे ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे. याला आळा बसणे आवश्यक आहे. तरी जिल्हाधिकाऱ्यांनी यात पुढाकार घेऊन मार्ग काढावा, असे या निवेदनात म्हटले आहे.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष अरुण यादव, शिवनाथ बियाणी, मोहन शेटे, दत्तात्रय धडेल, दत्तात्रय मिटके, अ‍ॅड. ज्योत्स्ना डासाळकर, सम्राट बच्चे, जगन्नाथ जोशी, डॉ. अनिल अनिखिंडी यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)