शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

शाहू छत्रपती मिलच्या जागेवर जागतिक दर्जाच्या स्मारकाची चौदा वर्षे प्रतीक्षाच, कोल्हापूरकरांची दिशाभूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 12:45 IST

निधीची घोषणाचा प्रत्यक्षात कार्यवाही नाही

कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती मिलच्या जागेवर जागतिक दर्जाचे भव्य स्मारक करण्याच्या २०१२ पासून आतापर्यंत केवळ घोषणाच झाल्या आहेत. प्रत्यक्षात प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. केंद्र आणि राज्य सरकारने स्मारकासाठी निधी नसल्याचे जाहीर करावे. या सर्व पार्श्वभूमीवर संयुक्त राजारामपुरी शिवजयंती उत्सव मंडळातर्फे प्रयत्न सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती अध्यक्ष कमलाकर जगदाळे, सेक्रेटरी मदन जाधव यांनी दिली.

पर्यटकांना सर्व सुविधा एकाच छताखाली मिळाव्यात, पर्यटन क्षेत्राच्या कक्षा रुंदावताना स्थानिक रोजगार निर्मितीला चालना मिळावी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी. शाहू मिल आणि कोटीतीर्थ तलाव परिसरातील ४० एकर जागेवर ‘राजर्षी शाहू छत्रपती मिल मेमोरियल’ या प्रकल्पाची घोषणा झाली. शाहू मिलच्या जागी ७५३ कोटींचा आराखडा तयार केला. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांनी हा प्रस्ताव तयार केला होता. तो प्रशासनाकडे मांडण्यात आला. मात्र त्याबाबत काहीच कार्यवाही झालेली नाही.
 
या प्रकरणी श्री शाहू छत्रपती मिल परिसर विकास समितीने आंदोलन करून वेळोवेळी मागण्या केल्या. जिल्हास्तरावर समिती स्थापन करण्याचे ठरले. वस्त्रोद्योग विभागाकडून जागा हस्तांतरणाचा अहवाल उच्च अधिकार समितीकडे सादर करण्याचे ठरले होते. मात्र आतापर्यंत जागा हस्तांतरणाची चर्चाच झाली आहे. मुंबईत बैठका झाल्या, मात्र प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही.

राष्ट्रीय स्मारकाच्या उभारणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे निधी उपलब्ध का होत नाही. सरकारकडून मदत मिळणार नसेल तर त्यांनी जाहीरपणे नागरिकांना सांगावे. शाहू मिल १८ नोव्हेंबर २००३ मध्ये बंद पडली. तेव्हापासून जिल्हा प्रशासन, महापालिका, राजकीय नेत्यांनी केवळ जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप उत्सव मंडळाने केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Shahu Mill Memorial: 14-Year Wait, Kolhapur Residents Misled

Web Summary : Kolhapur residents are still awaiting the Shahu Mill memorial, with only announcements since 2012. Despite plans and proposals, progress stalled due to funding issues. The Rajarampuri Shiv Jayanti Utsav Mandal plans action, criticizing government inaction and public deception regarding the mill's redevelopment.