सांबरे येथील हाणामारीत चारजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:22 IST2021-04-14T04:22:26+5:302021-04-14T04:22:26+5:30

कृष्णा रामू चव्हाण (वय ६२, रा. सांबरे) यांनी शिवाजी तुकाराम खराडे व सागर शिवाजी खराडे, तर शिवाजी खराडे यांनी ...

Four persons were injured in the clash at Sambre | सांबरे येथील हाणामारीत चारजण जखमी

सांबरे येथील हाणामारीत चारजण जखमी

कृष्णा रामू चव्हाण (वय ६२, रा. सांबरे) यांनी शिवाजी तुकाराम खराडे व सागर शिवाजी खराडे, तर शिवाजी खराडे यांनी कृष्णा चव्हाण व रामचंद्र कृष्णा चव्हाण यांच्याविरोधात शिवीगाळ व मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी व संशयित आरोपी यांची घरे समोरासमोर आहेत. तुकाराम खराडे, शिवाजी तुकाराम खराडे यांनी कृष्णा चव्हाण यांना दहा वर्षांपूर्वी ५ हजार रुपये उसने दिले होते. ते पैसे मागितले असता, तुला पैसे देणार नाही, काय करायचे ते कर, असे म्हणून खराडे व त्याची पत्नी रेणुका हिला कृष्णा चव्हाण व रामचंद्र चव्हाण यांनी मारहाण केल्याची, तर दुसऱ्या बाजूने शिवाजी खराडे व सागर खराडे यांच्याविरोधात कृष्णा चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. त्यामध्ये शिवाजी खराडे याने, तुझ्या बायकोने माझ्या बायकोकडून घेतलेले ५ हजार रुपये आताच्या आता दे, असे म्हणत दारू पिऊन अंगावर धावून येऊन डाव्या हातावर मारहाण करून जखमी केले आहे.

तसेच सागर खाडे याने फिर्यादीच्या दारात उभी असलेली मोटरसायकल (एमएच ०९ एझेड ५०४१) ही लाथ मारून पाडली व गाडीचे नुकसान केले.

Web Title: Four persons were injured in the clash at Sambre