शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

माजी महापौरांनी भिरकावली फाईल

By admin | Updated: August 22, 2014 00:51 IST

मोबाईल टॉवरवरून आक्रमक : एचसीएल, कचरा प्रश्नावरून प्रशासन धारेवर

कोल्हापूर : शहरात खुल्या जागेत मोबाईल टॉवर उभारल्याने पर्यावरणास मोठा धोका निर्माण होईल, या कारणास्तव आज, गुरुवारी झालेल्या महासभेत नगरसेवकांनी प्रशासनाचा टॉवर उभारण्याचा डाव हाणून पाडला. अशा प्रकारचे ठराव आणण्यापूर्वी सभागृहास पूर्वकल्पना द्या, प्रशासनाच्या अशा कुरघोड्यांमुळेच नगरसेवक बदनाम होत आहेत, असा आरोप करीत माजी महापौर सुनीता राऊत यांनी फाईल अधिकाऱ्यांच्या दिशेने भिरकावून निषेध व्यक्त केला. कचरा प्रश्न, कारागृहाभोवती ५०० मीटरचा नवा निकष, एचसीएल, ई-गव्हर्नन्स कंपनीवरून नगरसेवकांनी प्रशासनास धारेवर धरले. कचऱ्यांपासून वीजनिर्मिती करण्याचा ठेका दिलेली रोकेम ही कंपनीही पुण्यात सक्षमपणे काम करीत नाही. अशा वेळी प्रशासनाने कचऱ्याप्रश्नी त्वरित ठोस निर्णय घेण्याची मागणी नगरसेवकांनी केली. येत्या काही महिन्यांत टाकाळा येथे लँड फिल्ड साईट सुरू होणार असल्याने कचऱ्यांतून शहराची मुक्ती होईल, अशी ग्वाही आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सभागृहास दिली. शहरातील कचऱ्यांसाठी आरक्षित केलेल्या जागामालकांनी टी.डी.आर.चा लाभ घेतला आहे. त्या जागी कचरा प्रकल्प उभा करण्याची मागणी भूपाल शेटे यांनी केली.एचसीएल या ई-गव्हर्नन्स कंपनीशी महापालिकेने केलेला करार, केलेले काम, देत असलेली सेवा व त्यासाठी अदा केलेले पैसे याबाबत केंद्रीय लेखापरीक्षकांनी जोरदार आक्षेप घेतले आहेत, असा आरोप करीत महेश कदम यांनी कंपनीला जादा दिलेल्या दोन कोटी रुपयांची वसुली कशी करणार, असा सवाल उपस्थित केला. बिंदू चौकातील उपकारागृह व कळंबा कारागृहाभोवती ५०० मीटर जागा विकसित न करण्याबाबत शासन आदेश आहेत. याबाबत नेमलेल्या उच्चस्तरीय स्थायी समिती सदस्यांची त्वरित बैठक घेऊन अभिप्राय द्यावा, अशी मागणी नगरसेवक आदिल फरास यांनी केली.