पूरग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:43 AM2019-11-19T00:43:22+5:302019-11-19T00:43:30+5:30

कुरुंदवाड : महापूर, परतीच्या पावसाने पिकांच्या नुकसानीमुळे व रोजगार नसल्याच्या नैराश्येतून शिरढोण (ता. शिरोळ) येथील तुकाराम रामू माने (वय ...

Flooded farmer suicides | पूरग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

पूरग्रस्त शेतकऱ्याची आत्महत्या

Next

कुरुंदवाड : महापूर, परतीच्या पावसाने पिकांच्या नुकसानीमुळे व रोजगार नसल्याच्या नैराश्येतून शिरढोण (ता. शिरोळ) येथील तुकाराम रामू माने (वय ६५) या शेतकºयाने घराच्या तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलिसांत झाली आहे. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांत पूरग्रस्त शेतकरी आत्महत्येची ही दुसरी घटना घडली आहे.
अधिक माहिती अशी, माने यांचे एक एकर बागायती क्षेत्र आहे. शेती व शेतमजुरी करून घरचा चरितार्थ चालवत होते. मात्र, महापुराने आडसाली ऊस पीक गेल्याने तुकाराम यांनी दुसऱ्यांदा ऊस पिकाची लावणी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने तेही पीक गेल्याने खर्च, कर्ज कसे फेडावयाचे या विवंचनेत माने होते. त्यातच दोन महिने शेतीचे कामच नसल्याने रोजगाराअभावी आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे माने गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होते.
सोमवारी पहाटे त्यांनी घरालगत असलेल्या पडीक घराच्या तुळईस दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, सून, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस स्टेशनमध्ये असून तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Flooded farmer suicides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.