शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

गडकरींच्या स्वागताला इच्छुकांची झुंबड

By admin | Updated: September 14, 2014 00:35 IST

‘भाजप’ कार्यकर्ते बाजूलाच : आघाडीच्या बड्या शिलेदारांची उपस्थिती; जिल्ह्याच्या राजकारणातील बदलाची नांदी

कोल्हापूर : भाजपचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांची भाऊगर्दी उसळली. भाजपच्या कार्यकर्त्यांना मागे सारुन हीच झुंबड त्यांचे स्वागत करण्यास पुढे होती. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर वातावरणात कसा बदल होतो, याचा प्रत्यय या भाऊगर्दीमुळे दिसून आला.सकाळी नऊ वाजल्यापासूनच भाजपसह स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. या ठिकाणी खासदार राजू शेट्टी, खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, संभाजीराव पवार, सुरेश खाडे, प्रकाश शेंडगे, सुजित मिणचेकर, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, जिल्हा संघटन मंत्री बाबा देसाई, नगरसेवक आर. डी. पाटील, सुभाष रामुगडे, राजाराम शिपुगडे, पुंडलिक जाधव, के. एस. चौगुले, हिंदुराव शेळके, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष भगवान काटे, माजी आमदार संजय घाटगे, विश्वविजय खानविलकर, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सकाळी सव्वाअकराच्या सुमारास मंत्री गडकरी यांचे विमानतळावर आगमन झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, आमदार चंद्रकांतदादा पाटील होते. या ठिकाणी गडकरी यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी इच्छुकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी उसळली. पोलिसांनी सर्वांनाच आत सोडल्याने या ठिकाणी गर्दी झाली होती. प्रत्येकाच्या शुभेच्छा स्वीकारत गर्दीतूनच गडकरींनी मार्गक्रमण केले. यानंतर वेटिंग रूममध्ये जाऊन प्रमुख मान्यवरांची भेटही त्यांनी घेतली; परंतु स्वागत करणाऱ्यांची गर्दी पाहता पदाधिकाऱ्यांनी त्यांना या ठिकाणी अधिक वेळ थांबू दिले नाही. विमानतळाबाहेरही कार्यकर्त्यांची स्वागतासाठी गर्दी झाली होती. गडकरींनी उपस्थितांकडून पुष्पगुच्छ स्वीकारत व अभिवादन करतच गाडीत प्रवेश केला. काही काळ गाडीत उभे राहूनही त्यांनी पुष्पगुच्छ स्वीकारले. यानंतर ते महालक्ष्मी दर्शनाला गेले. इच्छुकांची गर्दीविधानसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हा परिषद सदस्य अमल महाडिक, ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, सत्वशील माने, नगरसेवक प्रा. जयंत पाटील, प्रा. बी. जी. मांगले, राजू माने, उद्योगपती चंद्रकांत जाधव, माणिक पाटील-चुयेकर, प्रताप कोंडेकर, बाळासाहेब नवणे, आदी नितीन गडकरी यांच्या भेटीसाठी उपस्थित होते.‘तुम्ही उठू नका...’विमानतळावरील वेटिंग रूममध्ये राजू शेट्टी, संजय पाटील, सुरेश खाडे, संभाजीराव पवार, सुजित मिणचेकर, सदाभाऊ खोत, संजयबाबा घाटगे, विश्वविजय खानविलकर, अमल महाडिक, सत्वशील माने आदी गडकरींच्या प्रतीक्षेत होते. या ठिकाणी सुरेश हाळवणकर आले. त्यांना सत्वशील माने यांनी उठून जागा देण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्यांना थांबवत, ‘तुम्ही उठू नका, तुम्ही बसा...कारण तुम्ही थेट वरून आला आहात’, अशा शब्दात हाळवणकरांनी टोला हाणला. (प्रतिनिधी)