शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून हाणामारी

By admin | Updated: October 31, 2016 00:06 IST

शिवाजी पेठेतील प्रकार : कार्यकर्ते माजी नगरसेवकांचे

कोल्हापूर : दिवाळीच्या शुभेच्छा देण्यावरून दोघा माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या प्रकाराने गोंधळ उडून तणाव पसरला. अखेर परिसरातील ज्येष्ठांनी मध्यस्थी करीत प्रकरणावर पडदा टाकल्याने हा वाद जुना राजवाडा पोलिस ठाण्यापर्यंत गेला नाही. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी खरी कॉर्नर परिसरातील एका माजी नगरसेवकाचे कार्यकर्ते शिवाजी पेठेत गेले. शुभेच्छा देत असताना येथील माजी नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही आमच्या परिसरात का आला?’ असे म्हणून त्यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार खरी कॉर्नर येथील माजी नगरसेवकाला समजला. त्यांचेही कार्यकर्ते संतप्त झाले. त्यानंतर शिवाजी पेठेतील काही कार्यकर्ते खरी कॉर्नर परिसरात आल्यानंतर दोन्ही माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना खरी कॉर्नर परिसरात हाणामारीने गोंधळ उडून तणाव पसरला. ऐन दिवाळीच्या लक्ष्मीपूजनादिवशीच कार्यकर्त्यांनी हाणामारीनेच एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या प्रकाराची शहरात दिवसभर जोरदार चर्चा होती. परिसरातील ज्येष्ठांनी तडजोडीने वाद मिटविल्याने या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही. (प्रतिनिधी)