शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘मंडलिक’चा अंतिम दर ३१५०

By admin | Updated: July 17, 2017 00:36 IST

‘मंडलिक’चा अंतिम दर ३१५०

लोकमत न्यूज नेटवर्कम्हाकवे : सदाशिवराव मंडलिक यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणेच कारखान्याची वाटचाल असून, अनावश्यक खर्चाला फाटा देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऊसदर देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याकडे आलेल्या उसाला एफ.आर.पी.प्रमाणे २५९० व १७५ असा २७६५ रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना अदा केला आहे. दुसरा हप्ता १३५ रु.प्रमाणे गणेश चतुर्थीपूर्वी आणि तिसरा अंतिम हप्ता १०० रु.प्रमाणे दिवाळी सणासाठी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करू. उशिरा गाळपास येणाऱ्या उसाला प्रतिटन १०० रूपये व पिकविलेला संपूर्ण ऊस गाळपास पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये जादा अनुदान देण्यात येणार आहे. सर्व बाबींचा विचार करता आपल्या कारखान्याचा प्रतिटन ऊसदर ३१५० रुपये होत असल्याची माहिती सदाशिवरा मंडलिक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रा. संजय मंडलिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्रा. मंडलिक म्हणाले, गाळप उद्दिष्टानुसार कारखाना प्रशासन ऊस तोडणी यंत्रणा व इतर आवश्यक बाबींचे नियोजन करते, परंतु जर उद्दिष्ट्यपूर्ती न झाल्यास सर्वच घटकांना याचा फटका बसतो. यावेळी माजी उपाध्यक्ष प्रकाश पाटील, संचालक वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगुले-म्हाकवेकर, प्रा. बापुसो भोसले-पाटील यांच्यासह कारखान्याती सर्व खाते अधिकारी उपस्थित होते....अन् मंडलिकांनी शब्द पाळलाऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेला संपूर्ण ऊस मंडलिक कारखान्याला देणाऱ्या शेतकऱ्यांना प्रतिटन ५० रुपये जादा अनुदान देण्याची घोषणा प्रा. मंडलिक यांनी केली होती, परंतु गतवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण न झाल्याने आर्थिक स्थिती कोलमडली. तरीही प्रा. मंडलिकांनी दिलेला शब्द पाळत हे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. गतवर्षी तीन लाख ५५ हजार ६५० मे. टन उसाचे गाळप झाले असून, त्यापोटी कारखान्याकडून शेतकऱ्यांना सुमारे ११० रुपये दिले जाणार आहेत. आज विजयी मेळावाआज, सोमवारी कारखाना कार्यस्थळावर कारखान्याच्या बिनविरोध संचालकांचा सत्कार समारंभ व विजयी मेळावा होणार आहे, अशी माहिती प्रा. मंडलिक यांनी दिली.