शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळात भ्रष्टाचार नाही

By admin | Updated: December 6, 2014 00:51 IST

कार्यकारिणीचे स्पष्टीकरण : निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांचे आरोप

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना आम्ही पै न् पै गोळा करून केली आहे. आजवर मंडळाच्या कारभारात एक रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. केवळ पद मिळाले नाही म्हणून आणि आगामी निवडणूका डोळ््यांसमोर ठेवून या शिखर संस्थेला बदनाम केले जात आहे. आमच्या कार्यकारिणीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पुराव्यानिशी सिद्ध करा. आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असे आव्हान चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर व कार्यवाह सुभाष भुरके यांनी कृती समितीला आज, शुक्रवारी पत्रकार परिषदेद्वारे दिले आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट-नाट्य व्यावसायिक कृती समितीने रविवारी पत्रकार परिषद घेवून चित्रपट महामंडळात मोठा भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप केला होता. या आरोपांचे खंडन करण्यासाठी आज महामंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी कृती समितीने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे संचालकांनी सांगितले. यावेळी अष्टेकर म्हणाले, विजय कोंडकेंना निवडणूकीनंतर अध्यक्षपद मिळाले नाही या सुडापोटी त्यांनी महामंडळाला वेठीला धरले. सुर्वे आणि कोंडके यांच्यातील वाद मिटवण्यासाठी कार्यकारिणीनेच पुढाकार घेतला होता. पण तो कोंडकेंनी मान्य केला नाही. आगामी निवडणुकीसाठीच हे सगळे राजकारण केले जात आहे. मात्र सभासद सुज्ञ आहेत. त्यांना चांगले वाईट कळते. यावेळी सुरेखा शहा, प्रमोद शिंदे, महेश पन्हाळकर, विजय शिंदे, अनंत काळे, सर्जेराव पाटील, सतीश बिडकर, इम्तियाज बारगीर उपस्थित होते. आता महामंडळ का आठवले ?दादासाहेब कोंडके असताना विजय कोंडके तीस वर्षे महामंडळाकडे फिरकले नाहीत, शासनाने दिलेली दिलेली सबसिडी रद्द करण्यासाठी या माणसाने आवाज उठवला होता, महामंडळाच्या विरोधात दुसरी संस्था स्थापन केली. आत्ताच या माणसाला चित्रपट महामंडळ का दिसले असा प्रश्न संचालकांनी केला. उपोषणाला बसतो म्हणाऱ्या महामंडळाच्या माजी कार्यवाह नी आपल्या कारकिर्दीत कार्यालयात काय काय उद्योग केलेत हे मांडायला गेले तर खूप आहे. पण आम्ही पत्रकार परिषद कुणावरही आरोप करण्यासाठी घेतलेली नाही. आमची बदनामी झाली आहेच पण महामंडळाची अधिक बदनामी नको त्यामुळे चर्चेला या आपण सविस्तर बोलू असे आवाहनही यावेळी करण्यात आले. फेर लेखापरीक्षण अहवाल कार्यकारिणीपुढे मांडण्याआधीच अध्यक्षांनी घटनाबाह्य कृत्य करत सभासदांना अहवाल द्यायला लावला. त्यामुळे कार्यकारिणीने हा अहवालच मंजूर किंवा ना मंजूर न केल्याने हिशेबाची पूर्तता करताच येणार नाही. प्रसाद सुर्वेंनी महामंडळाची रक्कम दिली नव्हती म्हणून त्यांच्यावर दिवाणी व फौजदारी कारवाई केली. सुवेर्नी साडे सहा लाख महामंडळाला भरले आहेत , तरिही त्यांच्यावर खटला अजूनही चालू आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही हेच चुकीचे आहे शिवाय मी सुर्वे व संजीव नाईक यांच्याबद्दल कोणतेही प्रतिज्ञा पत्र सादर केलेले नाही, असे सुभाष भूरके म्हणाले,माझ़्यावर महिलेने केलेला आरोप सिद्धच झालेला नाही त्यामुळे कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे अष्टेकर म्हणालेसंस्थेचे संचालक म्हणून आरोप करण्यात आल्याने कोर्टकचेरीचा खर्च संस्थेच्याच नावाने पडणार